esakal | Hingoli Rain Updates : हिंगोलीत रात्री जोरदार पाऊस
sakal

बोलून बातमी शोधा

पाऊस

Hingoli Rain Updates : हिंगोलीत रात्री जोरदार पाऊस

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात (Hingoli) मागच्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. दरम्यान शनिवारी (ता.११) रात्री दहा वाजता अचानक पाऊस सुरू झाला. तो पंधरा ते वीस मिनिटे कायम होता. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पावसाची (Rain) टिपटीप सुरू होती. आता हा पाऊस पिकासाठी हानीकारक असल्याचे शेतकरी सांगत आहेत. जिल्ह्यात मागच्या दोन ते तीन दिवसांपूर्वी सलग पाच दिवस पाऊस झाला. या पावसाने जिल्ह्यातील सिध्देश्वर धरण शंभर टक्के भरले आहे. इसापुर धरणात देखील नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. यासह जिल्ह्यातून वाहणाऱ्या कयाधू (Kayadhu), पैनगंगा (Painganga) या मुख्य नद्या दुथडी भरून वाहत होत्या. या नदीचे पाणी कालपासून ओसरले होते. तर जिल्ह्यातील लघु सिंचन तलाव, बंधारे देखील ओसंडून वाहत होते. औंढा येथील तलाव ओव्हरफ्लो झाला होता.

हेही वाचा: नांदेड जिल्ह्यात दिवसाढवळ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा खून

दरम्यान, दोन ते तीन दिवस पावसाने उघडीप दिली होती. शनिवारी दिवसभर ऊन पडले होते. मात्र वातावरणात दिवसभर उष्णता होती. रात्री दहा वाजता अचानक सुरुवातीला पावसाची भुरभुरी सुरू झाली. त्यानंतर अर्धातास चांगला पाऊस झाला. नंतर रात्री उशिरापर्यंत पावसाची टिपटीप सुरू होती. हा पाऊस हिंगोली शहरासह तालुक्यातील कारवाडी, बळसोंड, पिंपळखुटा, खांबाळा, भांडेगाव, सिरसम, बासंबा, सवड, घोटा, नर्सी आदी ठिकाणी झाला आहे. पाऊस सुरु असताना गार वारे देखील सुटले होते. दरम्यान आता हा पाऊस सोयाबीन पिकासाठी धोकादायक असल्याचे शेतकरी सांगत आहेत. सोयाबीन पिक शेंगाच्या अवस्थेत आहे. यामुळे या पिकाला पाण्याची आवश्यकता नाही. यामुळे शेंगा पोकण्यास अडचणी येणार आहेत. त्याचा परिणाम पिकाच्या उत्पादनावर होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

loading image
go to top