esakal | किल्ले धारूरमध्ये गारांचा पाऊस; फळबागांचे मोठे नुकसान

बोलून बातमी शोधा

heavy rain
किल्ले धारूरमध्ये गारांचा पाऊस; फळबागांचे मोठे नुकसान
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

किल्ले धारूर (बीड): किल्ले धारूर परिसरात दुपारी एकच्या दरम्यान एक तास गारांचा पाऊस झाला. यामध्ये फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील काही भागात गारपीटसह अवकाळी पावसाने तडाखा दिला.

सध्या भर उन्हाळ्यात अचानक पाऊस आल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. आंब्यासहित फळभाज्यांचे तर उघड्यावर असलेला कांदा भिजून खराब झाला. यावेळी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा: औरंगाबादमध्ये शेतीच्या वादावरून महिलेला मारहाण; मारहाणीत महिलेचा गर्भपात

वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील हळद,आंबा,पालेभाज्या आणि पपईसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.जोरदार पावसा सहवादळ वारे व गारांचा पाऊस झाला, अचानक आलेल्या पावसाने नागरिकांत दहशत निर्माण झाली. अचानक हवामानात बदल झाल्याने मेघ गर्जने सह गारांच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे यानंतर शेतकरी पुन्हा हवालदिल झाल्याचे चित्र दिसत आहे.