अंबड - जालना जिल्हयातील अंबड तालुक्याला पावसाने सलग तिसऱ्या दिवशी चांगलेच झोडपले. शेतशिवार ओलेचिंब झाले आहे. जिकडे तिकडे पाणीच पाणी चमकत आहे. शेतात अक्षरशः पाण्याचे पाट पसरले आहे. शेतशिवारातील ओढे, नाले पाण्याने तुडुंब भरून खळखळ वाहत आहे. शेतातील मोसंबी फळबागेत पाण्याचे पाट साचले आहे.