लिंबेजळगाव, तुर्काबादला जोरदार पाऊस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

लिंबेजळगाव, तुर्काबाद खराडी (ता. गंगापूर) येथे रविवारी (ता.15) सायंकाळी पाचच्या सुमारास एक तास जोरदार पाऊस झाला. गेल्या आठवडाभरापासून रोजच पाऊस कोसळत असला तरी मात्र आज एक तास झालेल्या पावसाने सर्वत्र डबके साचले. सर्वच पिके फुलोऱ्यात असली तरी नदी-नाले, ओढे, प्रकल्प अद्यापही कोरडेठाक आहेत.

लिंबेजळगाव  (जि.औरंगाबाद) : लिंबेजळगाव, तुर्काबाद खराडी (ता. गंगापूर) येथे रविवारी (ता.15) सायंकाळी पाचच्या सुमारास एक तास जोरदार पाऊस झाला. गेल्या आठवडाभरापासून रोजच पाऊस कोसळत असला तरी मात्र आज एक तास झालेल्या पावसाने सर्वत्र डबके साचले. सर्वच पिके फुलोऱ्यात असली तरी नदी-नाले, ओढे, प्रकल्प अद्यापही कोरडेठाक आहेत.

मात्र, आजच्या पावसाने मका व कपाशी पिकांवरील लष्करी अळीला थोड्याफार प्रमाणात फरक पडेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. सर्वच पिके अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे जोराची वाढीला लागलेली आहेत. उभ्या पिकांवर उत्पन्न यंदा वाढणार अशी आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र, कुठल्याही विहिरीला पाणी वाढले नसल्याचे शेतकरी सुधाकर वाळेकर यांनी सांगितले. पाऊस झाल्याने लिंबेजळगाव, तुर्काबाद गावातील अंतर्गत रस्त्यांवर चिखल झाला असून अनेकजण घसरल्याच्या घटना घडल्या.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rain In Limbejalgaon