मराठवाड्यात आतापर्यंत १११ मिलिमीटर पाऊस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जून 2019

मराठवाड्यात गेल्या वर्षीपेक्षा यंदा चांगले पर्जन्यमान राहील, असा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र, गेल्या २३ दिवसांत मराठवाड्यात केवळ १११.८२ मिलिमीटर पाऊस झाला. यात रविवारी (ता.२३) सकाळी आठ वाजेपर्यंत ७.५४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर औरंगाबाद जिल्ह्यातील चार मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चार टक्‍केच सरासरी पाऊस झाला आहे.

औरंगाबाद - मराठवाड्यात गेल्या वर्षीपेक्षा यंदा चांगले पर्जन्यमान राहील, असा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र, गेल्या २३ दिवसांत मराठवाड्यात केवळ १११.८२ मिलिमीटर पाऊस झाला. यात रविवारी (ता.२३) सकाळी आठ वाजेपर्यंत ७.५४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर औरंगाबाद जिल्ह्यातील चार मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चार टक्‍केच सरासरी पाऊस झाला आहे.

यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात काही जिल्ह्यांत पाऊस झाला. याचे प्रमाण अत्यल्प होते. १ ते ३१ जून २०१८ दरम्यान मराठवाड्यात ७७९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. आतापर्यंत १११.८२ मिलिमीटरची म्हणजे २८.१ टक्‍के पावसाची नोंद झाली.  गतवर्षी जून महिन्यात औरंगाबाद जिल्ह्यात ६७५.४६ मिमी, जालना-७८८.३१, परभणी-७७४.६२, हिंगोली- ८९२.७६, नांदेड- ९५५.५४, बीड-६६६.३६, लातूर- ८०२.१३, उस्मानाबाद- ७७६.८१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. रविवारी सकाळी सुरू झालेला पाऊस तीन तासांपर्यंत चालला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील उस्मापूर, फुलंब्री, वडोदबाजार आणि नागमठाण या मंडळांत ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rain Marathwada Monsoon