नांदेड जिल्ह्यावर आभाळ फाटले   

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

नांदेड : जिल्ह्यातील माहूर, किनवट, भोकर, हिमायतनगर, नांदेड, अर्धापुर व मुदखेड या आठ तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. या आठ तालुक्यातील तब्बल 41 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. या सोबतच कंधार, लोहा, बिलोली व उमरी या तालुक्यातही पावसाचे प्रमाण अधिक आहे. या जोरदार पावसामुळे जिल्हा जलमय झाला. अनेक छोट्या-मोठ्या नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे नदीकाठची तसेच सखल भागातील पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच अनेक घरांमध्येही पाणी शिरले आहे.

आपत्ती निवारणासाठी प्रशासनाने तयारी केली आहे.शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात एकूण 1169 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर सरासरी 71.86 मिलिमीटर पाऊस झाला. यामुळे नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाल्याचे ठळकपणे जाणवत आहे.

Web Title: heavy rain in nanded