नांदेड : ‘व्हिआयपी’ मार्गावर सफाई कामगारांची कसरत

rain-o.jpg
rain-o.jpg

नांदेड : जिल्ह्यात आठवडा भरापासून परतीच्या पावसाचे आगमन झाले आहे. शुक्रवारी (ता. २०) दुपारपासून ग्रामीण भागात दमदार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला. सायंकाळी शहरात धो-धो पावसामुळे रस्त्यांना तळ्यांचे स्वरुप आले हाेते. रस्त्यांच्या सखल भागात रात्रीच्या पावसामुळे साठलेल्या डबक्यातून सकाळी पादचाऱ्यांना मार्ग काढावा लागला. सकाळीपासूनच महाविद्यायीलन विद्यार्थ्यांसह नाेकरदार, कामगरांची मुख्य रस्त्यांवर रहदारी असते.

दरम्यान, त्यातच रस्त्यावरुन धावणाऱ्या वाहनांमुळे डबक्यातून उडणारे पाण्याच्यसा फवाऱ्यापासून अंग चुकविण्याची कसरत पादचाऱ्यांना करावी लागली. शहरातील महात्मा फुले पुतळा ते साठे चौक या व्हिआयपी मार्गावर पेट्रोल पंपासमोर सकाळी महापालिकेच्या महिला सफाई कामगार काम करत असताना. रस्त्यावरील सखल भागात साचलेल्या डबक्यामुळे वाट वाकडी करुन पुढे जाणाऱ्या एका महिलेच्या अंगावर दुचाकीचा फवारा उडाल्याचे पाहून सफाई कामगार महिलांनी हातातल्या झाडूने थेट डबकेच उपसायला सुरवात केली. या ज्येष्ठ महिलांनी तब्बल अर्धा तासाच्या कसरतीने झाडूच्या साह्याने हे डबके उपसून काढत मानवतेचा संदेश दिला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com