नांदेडमध्ये साठ मंडळांत अतिवृष्टी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

जिल्ह्यातील बारा तालुक्यासह तब्बल साठ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. यंदाचा सर्वात मोठा पाऊस जिल्ह्यात सोमवारी झालेल्या जोरदार पावसामुळे 16 पैकी मुखेड, देगलूर, माहूर, किनवट हे चार तालुके वगळता उर्वरित बारा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सरासरी ८०.३५ मिलिमीटर पावसाची नोंद जिल्ह्यात झाली.
 

नांदेड: जिल्ह्यातील बारा तालुक्यासह तब्बल साठ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. यंदाचा सर्वात मोठा पाऊस जिल्ह्यात सोमवारी झालेल्या जोरदार पावसामुळे 16 पैकी मुखेड, देगलूर, माहूर, किनवट हे चार तालुके वगळता उर्वरित बारा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सरासरी ८०.३५ मिलिमीटर पावसाची नोंद जिल्ह्यात झाली.

सोमवारी झालेला हा पाऊस यंदाचा सर्वात मोठा पाऊस गणला जात आहे. जिल्ह्यातील ८० महसूल मंडळांपैकी तब्बल साठ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसामुळे जिल्ह्यात मंगळवारी सकाळपर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला. तसेच लहान मोठी जनावरे दगावली आहेत. प्रशासनाकडून नागरिकांच्या घराची तसेच खरिपातील पिकांचे नुकसानीचा अंदाज घेण्याचे काम चालू आहे.

Web Title: Heavy rain in nanded district