नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस                         

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

नांदेड जिल्ह्यात मध्यरात्रीपासून जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.

नांदेड : जिल्ह्यात मध्यरात्रीपासून जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. रविवारी देखील जिल्ह्यात जाेरदार पाऊस सुरु आहे.

जिल्ह्यातील कंधार तालुक्यात पेठवडज, कुरुळा, बारूळ, नांदेड शहरातील वाजेगाव, लिमगाव, मुदखेड परिसरात जोरदार पाऊस कुंडलवाडी, रामतीर्थ, देगलूर, धर्माबाद तालुक्यामध्ये काही ठिकाणी तुरळक पाऊस तर काही भागात रात्री जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे सोयाबीन व अन्य खरीप हंगाम हातातून गेल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rain in Nanded district