Rain In Tuljapur Taluka
Rain In Tuljapur Taluka

तुळजापूर तालुक्यातील पांगरधरवाडी गावाचा संपर्क तुटला, पहाटेपासून जोरदार पाऊस

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजापूर तालुक्यात रविवारी (ता.२०) मध्यरात्री झालेल्या पावसाने सोयाबीन पिकाचे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. पांगरधरवाडी गावाचा सोमवारी (ता.२१) पहाटे दोन वाजल्यापासून संपर्क तुटला आहे. तालुक्यात सुरू असणाऱ्या पावसाने सोमवारी पहाटे रौद्ररूप धारण केले आहे.

सोलापूर-तुळजापूर रस्त्यावरील सांगवी काटी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने सांगवी काटी ते पांगरधरवाडी रस्त्यावरील पुलावर मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे. पांगरधरवाडी येथून सांगवी काटी येथे यावे लागते आणि तेथून सोलापूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गातून तुळजापूरला यावे लागते. पांगरधरवाडी हे एकमेव गाव ओढ्याच्या पलीकडे आहे.

या संदर्भात सांगवी काटी येथील शेतकरी विश्वास मगर यांनी सांगितले की, सांगवी काटी ते पांगरधरवाडी जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावर दहा फुट पाणी आहे. पांगरधरवाडी येथील संपर्क तुटला आहे. पांगरधरवाडी येथील नागरिक तुळजापुरकडे येऊ शकत नाहीत. तालुक्यातील मंगरूळसह अनेक भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने सोयाबीन पीक पाण्याखाली आहे. तहसीलदार सौदागर तांदळे यांच्याशी ‘सकाळ'ने संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सांगवी काटी ते पांगरधरवाडी गावचा संपर्क तुटला आहे. सुमारे पाच फूट पाणी सांगवी काटी ते पांगरधरवाडी रस्त्यावरील पुलावर आहे.


 
सांगवी काटी गावाकडे जाणारा रस्ता पुलावर पाणी आल्याने बंद झालेला आहे.  पाऊस पडल्यानंतर सातत्याने रस्ता बंदच राहणार आहे. दुग्ध व्यावसायिकांचे दुध तसेच शेतकऱ्यांच्या पशुधनाचे दुध बाजार विक्रीसाठी जाऊ शकणार नाही. दळणवळण बंद असल्याचा परिणाम आमच्या गावावर झालेला आहे.
- बालाजी डोंगरे, ग्रामस्थ, पांगरधरवाडी (ता.तुळजापूर)
 

गावामध्ये कोणीही येऊ आणि जाऊ शकत नाही. गावातील सर्व व्यवहार रस्ता बंद असल्याने ठप्प झालेले आहेत. रात्री चालू झालेले पाणी अजूनही पुलावर उभे आहे. मागील दहा तासांपासून सांगवी काटी गावाकडे जाणारा पुल पाण्याखाली आहे.
- शंकर कदम, ग्रामस्थ, पांगरधरवाडी (ता.तुळजापूर)

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com