बीड जिल्ह्यात जोरदार पाऊसाची नोंद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

पंधरा दिवसापासून गायब असलेल्या पावसाचे शनिवारी (ता. 7) जोरदार आगमन झाले. परळी तालुका वगळता इतर दहा तालुक्यात पाऊस झाला. जिल्ह्यातील 63 पैकी 56 महसूल मंडळात पाऊस झाला. विडा महसूल मंडळात अतिवृष्टी (87 मिमी) पाऊसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 208.27 मिलीमिटर (सरासरी 18.90 मिमी) पावसाची नोंद झाली आहे.

बीड: पंधरा दिवसापासून गायब असलेल्या पावसाचे शनिवारी (ता. 7) जोरदार आगमन झाले. परळी तालुका वगळता इतर दहा तालुक्यात पाऊस झाला. जिल्ह्यातील 63 पैकी 56 महसूल मंडळात पाऊस झाला. विडा महसूल मंडळात अतिवृष्टी (87 मिमी) पाऊसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 208.27 मिलीमिटर (सरासरी 18.90 मिमी) पावसाची नोंद झाली आहे.
 
शुक्रवारी काही भागात पावसाने हजेरी लावली होती. शनिवारी दुपार पासूनच जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी उशिरापर्यंत पाऊस पडत होता. परळी वगळता इतर दहा तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. सर्वाधिक (42 मिमी) पाऊस केज तालुक्यात झाला. या तालुक्यातील विडा महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे.

दरम्यान, पावसाने उघडीप दिल्याने पेरणी झालेली पिके सुकू लागली होती. तर, बहुतांश भागात पेरणी रखडली होती. शनिवारच्या पावसाने पेरणी झालेल्या पिकांना दिलासा भेटला असून उर्वरित पेरण्यांनाही वेग येणार आहे. 

सात महसूल मंडळे कोरडी
शनिवारी जिल्ह्यात अपवाद वगळता सर्वदुर पाऊस झाला. यामध्ये परळी तालुक्यातील परळी, सिरसाळा, नागपूर, धर्मापूरी व गाडेपिंपळगाव तसेच आष्टी तालुक्यातील पिंपळा व धारुर तालुक्यातील मोहखेड हे सात मंडळ कोरडे राहिले.

तालुकानिहाय सरासरी पाऊस
- बीड : 35.45मिमी.
- पाटोदा : 25.75 मिमी.
- आष्टी : 07.43मिमी.
- गेवराई : 11.50 मिमी.
- शिरूर : 28.33 मिमी.
- वडवणी : 10.00 मिमी.
- अंबाजोगाई: 05.80 मिमी.
- माजलगाव : 21.00 मिमी.
- केज : 42.00 मिमी
- धारूर : 21.00 मिमी.
- परळी : 00.00 मिमी

Web Title: Heavy rain recorded in Beed district

टॅग्स