नुकसानीची माहिती ७२ तासांत कळवण्याचे कृषी विभागाचे आवाहन

नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी ७२ तासांत याची माहिती संबंधित विमा कंपनीस कळवावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे
latur
laturlatur

लातूर: जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून सर्वदूर पाऊस होत आहे. सध्या खरीप पिके शेतात उभी आहेत. प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबी अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भूस्सखलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग यामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसानभरपाई दिली जाते. फळपीक विमा धारक शेतकऱ्यांना देखील वेगाचा वारा व गारपीट या बाबीकरीता वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई दिली जाते. असे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी ७२ तासांत याची माहिती संबंधित विमा कंपनीस कळवावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकाच्या नुकसानीची माहिती घटना घडल्यापासून ७२ तासांत क्रॉप इन्सूरन्स (Crop Insurance) या मोबाईल ॲपद्वारे द्यावी. यात शेतकऱ्यांना व्यक्तीश: अर्ज, कागदपत्रे द्यावे लागणार नाहीत व कार्यालया समोरील संभाव्य गर्दी होणार नाही. ॲपद्वारे दिलेल्या अर्जाची पुष्टी करून संबंधित शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे डॉकेट आयडी दिला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना अर्जाची सद्यःस्थिती ॲपद्वारेच पाहता येणार आहे.

latur
Beed: कोरोना पुन्हा पावणे दोनशे पार; आष्टी, शिरूरमध्ये संख्या वाढतीच

मोबाईल अॅपद्वारे शक्य न झाल्यास सदर आपत्तीची माहिती बँक, कृषी विभाग व महसूल विभाग यांना देण्यात यावी. सदरची माहिती संबंधित विभागाकडून विमा कंपनीस तत्काळ पुढील ४८ तासात पाठवण्यात येणार आहे. वरील मोबाईल ॲप गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून, मराठी भाषेमध्ये माहिती भरता येणे शक्य आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे यांनी प्राधान्याने ॲपद्वारे नुकसानीची सूचना नोंदवावी व अधिक माहितीसाठी संतोष भोसले, जिल्हा प्रतिनिधी भारतीय कृषी विमा कंपनी (मोक्र ९३७०९५००४४) व फळपीक विमा संदर्भात अविनाश खेडकर जिल्हा प्रतिनिधी एचडीएफसी ॲग्रो जनरल इन्शुरंस कंपनी (८८८८४३६०५४) यांच्याशी किंवा नजीकच्या कृषी विभागाशी संपर्क करावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गावसाने यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com