हिंगोलीत पावसाचे दमदार आगमन

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 June 2020

जिल्‍ह्यात दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. शुक्रवारी दुपारपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळच्या सुमारास हिंगोली शहरात मेघगर्जनेसह एक तास जोरदार पाऊस झाला आहे. 

हिंगोली : जिल्‍ह्यात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी (ता.१९) मेघगर्जनेसह दमदार पाऊस झाला. सायंकाळी उशिरापर्यंत हिंगोली शहरासह सेनगाव, वसमत, कळमुनरी व औंढा नागनाथ तालुक्‍यातील काही गावांत पावसाची रिपरिप सुरूच होती.

जिल्‍ह्यात दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. शुक्रवारी दुपारपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळच्या सुमारास हिंगोली शहरात मेघगर्जनेसह एक तास जोरदार पाऊस झाला आहे. 

हेही वाचाआता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट -

हिंगोली तालुक्यात पाऊस

तसेच हिंगोली शहरासह तालुक्‍यातील कनरेगाव नाका, फाळेगाव, मोप, खांबाळा, बळसोंड, कारवाडी, अंधारवाडी, कोथळज, सवड, नरसी नामदेव, घोटा, सिरसम बुद्रुक, बांसबा, जोडतळा, हिरडी, पेडगाव, खेर्डा, धोतरा, पातोंडा, खडकद, तिखाडी, वऱ्हाडी, लोहरा, भिंगी, डिग्रस, ढोलउमरी आदी गावांतही पावसाने हजेरी लावली.

सेनगाव, कळमनुरी तालुक्यात पाऊस 

तसेच सेनगाव तालुक्‍यातील सवना, केंद्रा बुद्रुक, कहाकर, बटवाडी, मन्नास पिंपरी, वसमत तालुक्‍यातील गिरगाव, पार्डी बुद्रुक, माळवटा, सोमठाणा, खाजमापूरवाडी, कुरुंदा, कोठारी, कळमनुरी तालुक्‍यातील बोल्‍डा, येहळेगाव, जांब, सिंदगी, पोतरा, येहळेगाव गवळी, असोला आदी गावात पाऊस झाला. 

शेतकऱ्यांना दिलासा 

 औंढा नागनाथ शहरासह तालुक्‍यातील गोळेगाव, साळणा, येळी, गोजेगाव, नागेशवाडी आदी गावांत पाऊस झाला. अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत पावसाची रिमझिम सुरू होती. दरम्‍यान, या पावसाने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

शेवाळा येथे शेतकरी करताहेत दुबार पेरणी

शेवाळा : कळमनुरी तालुक्‍यातील शेवाळा येथे मृग नक्षत्रात झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, पेरलेले बियाणे निघाली नसल्याने शेतकऱ्यांनी त्‍यावर वखर फिरवित नव्याने पेरणी सुरू केली आहे.

येथे क्लिक कराचार लाख क्विंटल कापसाची खरेदी -

शेतकरी संकटात सापडले 

शेवाळ्यासह देवजना, पिंपरी, कान्हेगाव शिवारात बुधवारी (ता. दहा) वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्‍यानंतर शेतकऱ्यांनी शनिवार (ता. १३) पेरणीस सुरवात केली. यात अनेकांनी घरगुती तसेच बाजारपेठेतून खरेदी केलेल्या सोयाबीन बियाणाची पेरणी केली. मात्र, पेरणी केलेले बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

दुबार पेरणीसाठी बियाणे खरेदी

 शेतकऱ्यांनी बियाणे निघाले नसल्याने त्‍यावर वखर फिरवून नव्याने पेरणी सुरू केली आहे. शेवाळा गावासह देवजना, पिंपरी, कान्हेगाव शिवारातील शेतकरी सध्या पेरणीत व्यस्त आहेत. दरम्यान, दुबार पेरणीसाठी बियाणे खरेदी करावे लागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rains In Hingoli Hingoli News