esakal | वडीगोद्री विभागात जोरदार पाऊस
sakal

बोलून बातमी शोधा

jalana

वडीगोद्री विभागात जोरदार पाऊस

sakal_logo
By
दिलीप दखने

वडीगोद्री : वडीगोद्री विभागात अंतरवाली सराटी, नालेवाडी, आदी ठिकाणी शनिवार ( ता.४ ) रोजी रात्री पासुन जोरदार पाऊस झाल्याने शेतात पाणी साचले असुन नालेवाडी येथील मांगनी नदी , अंतरवाली सराटी येथील सुखी नाला ,लेंडी नाला येथे पाणी आले आहे. भागात रात्री पासून जोरदार पाऊस पडत आहे. मांगनी नदीला पाणी आल्याने वडीगोद्री ते भांबेरी रस्त्यावर वाहतुक बंद झाली आहे. नालेवाडी, रेणापुरी ,चंदनापुरी ,दह्याळा ,भांबेरी या गावाची वाहतुक आहे. वडीगोद्री येथुन येणारे वाहान नालेवाडी पासुन वापस जात आहे. (Jalna News)

हेही वाचा: 'सरकारला लॉकडाऊन बरा वाटतोय', राज ठाकरेंची टीका

अंतरवाली सराटी येथील सुखी नाल्याला पाणी आले असुन नाला भरूच वाहत आहे. भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला आहे. धाकलगाव, शहापुर या ठिकाणी मंगळवार रात्री पासून पाऊस पडत शहापुर येथील गल्हाटी नदीला पुर आला आहे. सतत पाऊस पडत असल्यामुळें शेतात पाणी साचले आहे .सोयाबीन, कापुस,तुर ,या पीकांचे नुकसान होत आहे.

loading image
go to top