dhanora khurd heavy rain
sakal
धानोरा - अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा खुर्द परिसरात ता. २८ मंगळवार संध्याकाळी आठ पासून रात्रभर जोरदार पाऊस झाल्याने रब्बी पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना फटका बसला असून अचानक आलेल्या पावसामुळे ऊसतोड मजुरांची तारांबळ उडाली होते.
ऊसतोड मजुराने तोडून टाकलेला ऊस फडातच अडकून बसला आहे. ऊसतोड मजुरांना रात्रभर कोपीत ताटकळत बसावे लागले. बुधवारी तीन ते चारच्या दरम्यान जोरदार पाऊस झाला आहे.