वाढत्या तापमानात भरघोस गहू उत्पादन

Wheat
Wheat

औरंगाबाद - देशातील संभाव्य धान्याची तूट लक्षात घेता 45 अंश तापमानातही भरघोस उत्पादन देणारे गव्हाचे वाण विकसित करण्याचे काम सुरू आहे. गव्हातील प्रोटिनचे वाढीव प्रमाण असलेले वाण आगामी वर्षात बाजारात आणले जाणार असल्याची माहिती "इश्‍वेद बायोटेक'चे व्यवस्थापकीय संचालक संजय वायाळ यांनी दिली.

एमआयडीसी कार्यालयात सोमवारी त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांपुढे संवादातून आपला जीवन प्रवास मांडताना संशोधनाबाबतही सांगितले. आपण रोज एका लहानग्या देशाएवढी लोकसंख्या जन्माला घालत असताना, त्यांच्या पोषणाचा विषय 2025 पर्यंत उद्‌भवणार आहे. त्याला अनुसरून गव्हाचे 45 अंश तापमानातही बंपर उत्पादन देऊ शकणारे वाण आपण तयार करीत असल्याचे संजय वायाळ यांनी सांगितले.

अनेकदा थंडी कमी पडल्याने मार खाणारे गव्हाचे उत्पादन वाढणार असल्याचा दावा त्यांनी केला. सध्याचे एकरी 12-16 क्विंटल असलेले उत्पादन 30 क्‍विंटलपर्यंत जाईल, तसेच नव्या वाणात प्रोटिनचे प्रमाण 20 टक्के अधिक राहणार असल्याचा दावाही त्यांनी केला. या वाणाची प्रात्यक्षिके कर्नाल (हरियाना), उत्तर प्रदेश आणि नांदेड भागात घेतल्याचे ते म्हणाले. या वेळी विभागीय अधिकारी सोहम वायाळ, रवींद्र कुलकर्णी, भूषण हर्षे यांची उपस्थिती होती.

"ऍग्रोवन'चा हातभार
गरिबी दूर करण्यासाठी शिक्षण घेऊन अमेरिकेला जाण्याची तजवीज केली. त्यानंतर सॉफ्टवेअर ऍनॅलिस्ट म्हणून जर्मनीत गेल्यावर "ऍग्रोवन' वाचण्याचा छंद लागला. कृषी आधारित उद्योगाकडे वळण्याचा विचार "ऍग्रोवन'नेच दिला. त्यावर जगभर फिरून आपल्या उद्योगाचा 700 पानी प्रकल्प अहवाल तयार केला होता, असेही संजय वायाळ यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com