निराधार महिलांचे अधारवड बनून केली मदत

विनोद आपटे
शनिवार, 11 एप्रिल 2020

या लॉकडाऊनमुळे अनेकजण अडचणीत सापडले आहेत. दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्न वाढत असल्यामुळे हा लॉकडाऊन कधी संपेल याची काहीच शाश्वती नाही. यात ज्यांचे हातावर पोट आहे. त्यांच्या हाताला कामे मिळत नाहीत. अशातच वयस्कर निराधार महिलांच्याही हाताला कामे नाहीत. खर्चाला पैसे नाहीत. शासनाच्या योजनेचा काहीच फायदा होत नाही. या अवस्थेत अन्नाविना राहण्याची वेळ मुखेड तालुक्यातील डोरनाळी येथील निराधार महिलांवर आली होती.

मुक्रमाबाद, (ता.मुखेड, जि. नांदेड) ः ‘कोरोना’वर मात करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सर्वत्र लॉकडाऊन केले आहे. पण या लॉकडाऊनमुळे वेळेवर जेवण मिळत नसल्याने व शासनाच्या योजनेचा कुठलाच फायदा होत नसल्यामुळे निराधार महिलेची उपासमार होत होती. पण प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख मन्मथ खंकरे, यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत लॉकडाऊन असे पर्यंत या निराधार महिलांना अन्न-धान्य देण्याची भूमिका घेऊन या निराधार महिलांचा आधारवड बनले आहेत.

 

निराधार महिलांच्याही हाताला कामे नाहीत

या लॉकडाऊनमुळे अनेकजण अडचणीत सापडले आहेत. दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्न वाढत असल्यामुळे हा लॉकडाऊन कधी संपेल याची काहीच शाश्वती नाही. यात ज्यांचे हातावर पोट आहे. त्यांच्या हाताला कामे मिळत नाहीत. अशातच वयस्कर निराधार महिलांच्याही हाताला कामे नाहीत. खर्चाला पैसे नाहीत. शासनाच्या योजनेचा काहीच फायदा होत नाही. या अवस्थेत अन्नाविना राहण्याची वेळ मुखेड तालुक्यातील डोरनाळी येथील निराधार महिलांवर आली होती. पण प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख यांनी जोपर्यंत लॉकडाऊन आहे. तोपर्यंत गावातील सर्वच निराधार महिलांना घरपोच अन्न, धान्ये देण्यात येईल, अशी भूमिका घेत गावात जाऊन स्वखर्चाने या महिलांना गहू, तांदूळ, तेल यासह दैनंदिनी लागणाऱ्या सर्वच वस्तू या वेळी वाटप करून त्यांना धीर देण्यात आल्याने या लॉक डाऊनमध्ये निराधार महिलेसाठी मन्मथ खंकरे हे आधारवड बनले आहेत.

 

हेही वाचा -  तंत्रस्नेही शिक्षक समूहाची डिजिटल शैक्षणिक चळवळ, कशी? ते वाचाच

 

येथील असंख्य निराधार महिलांचा अन्न -धान्यांचा प्रश्न मिटला आहे. या वेळी निखिल कोयलकोंडेवार, निखिल गोगा, तानाजी पाटील, सदानंद घाळे, अमित पंचडे, योगेश शिंदे, शिवानंद दासरवार अजय एमेकर यांच्यासह गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. या लॉकडाऊनमुळे अनेक निराधार महिलांचा व गरीब कुटुंबाचा उदारनिर्वाहाचा प्रश्न उभा टाकला असून अशा परिस्थितीत या गरजवंताची मदत करण्याची आपल्या सर्वाची जबाबदारी आहे. अशा गरजूंची नावे मला कळवावे त्यांना हवी ती, मदत करण्यात येईल असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख मन्मथ खंकरे यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Help by becoming a baseless woman, nanded news