जिवाची पर्वा न करता केली मदत आता पोलिसांनी...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 June 2020

इसापूर धरणाच्या जलाशयात बुडून मृत्यू पावलेल्या तीन युवकांचे मृतदेह स्वतःच्या जिवाची पर्वा न करता प्रशासनाच्या सांगण्यानुसार बारा नागरिकांनी दोन तास पाण्यामध्ये शोध घेत पाण्याबाहेर काढले होते. 

कळमनुरी(जि. हिंगोली) : इसापूर धरणाच्या जलाशयात बुडून मृत्यू पावलेल्या तीन युवकांचे मृतदेह आपल्या जिवाची पर्वा न करता पाण्याबाहेर काढण्यास मदत करणाऱ्या कळमनुरी, ढोलक्याची वाडी, मोरगव्हाण व शेनोडी येथील १२ नागरिकांचा गुरुवारी (ता.१८) पोलिस प्रशासनाकडून सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

रविवार (ता. सात) हिंगोली येथील काही युवक इसापूर धरणाच्या मोरगव्हाण भागातील बॅक वॉटरमध्ये पोहण्यासाठी उतरले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तीन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. पोलिसांसमोर मृतदेह बाहेर काढण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. 

हेही वाचाचार लाख क्विंटल कापसाची खरेदी -

मृतदेह पाण्याबाहेर काढले

या वेळी पोलिस प्रशासनाने कळमनुरी व मोरगव्हाण येथील पट्टीचे पोहणारे नागरिक व धरणाच्या पाण्यात मासेमारी करणाऱ्या ढोलक्याची वाडी, शेनोडी येथील मच्छिमारांना बोलावून मृतदेहांचा शोध चालविला होता. स्वतःच्या जिवाची पर्वा न करता प्रशासनाच्या सांगण्यानुसार बारा नागरिकांनी दोन तास पाण्यामध्ये शोध घेत तीन युवकांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले होते. 

मदत करणाऱ्या बारा जणांचा समावेश

पोलिस प्रशासनाने याची दखल मदत करणाऱ्या कांता पाटील, समशेर पठाण, आप्पाराव कदम (रा. कळमनुरी), नागोराव पाईकराव, धम्मकिरण पाईकराव, जोतिबा खंदारे, अमोल खंदारे, संभाजी खंदारे (रा. शेनोडी), काळूराम बोलके, दिलीप पाटील (रा. मोरगव्हाण), तुळशिराम भिसे, विठ्ठल भिसे (रा. ढोलक्याची वाडी) यांचा सत्कार करण्यात आला.

पोलिस अधिकाऱ्यांची उपस्थिती

गुरुवारी पोलिस निरीक्षक रणजीत भोईटे, उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर, प्रतिभा शेटे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी पोलिस कर्मचारी गणेश सूर्यवंशी, श्री. राठोड, अहमद पठाण, संदीप पवार, रवी बांगर, शिवाजी पवार, लक्ष्मण भगत, सुरेश बांगर, विकी ऊरेवार यांची उपस्थिती होती.

येथे क्लिक कराआता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट -

बावीस पोलिस कर्मचारी नाईकपदी

हिंगोली : जिल्‍ह्यातील काही पोलिस कर्मचाऱ्यांनी स्‍वेच्‍छानिवृती स्वीकारली असून काही जणांची हवालदारपदी पदोन्नती झाली आहे. त्यामुळे रिक्‍त झालेल्या जागेवर २२ पोलिस शिपायांना नाईकपदी पदोन्नती दिल्याचे आदेश पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांनी काढले आहेत.

पोलिस अधीक्षकांचे आदेश

यात शेख अकबर, सुरेश बोखारे, बालाजी रनेर, अलका चव्हाण (पोलिस मुख्यालय), शिवप्रसाद बुट्टे (कुरुंदा), शेख जावेद, अनिता जाधव (हिंगोली ग्रामीण), जियाखॉ पठाण, उमेश जाधव, असलम गारवे (हिंगोली शहर), कृष्णा राठोड (कळमनुरी), गजानन पवार, अब्‍दुल पठाण, रवी सावळे (औंढा नागनाथ), पंडित तारे (गोरेगाव), श्रीराम पुरी, गोविंद शिंदे (सेनगाव), सारिका राठोड (बासंबा), बालासाहेब खोडवे (कळमनुरी), हेमंत दराडे (नरसी नामदेव), ज्‍योती काळे (आखाडा बाळापूर), गजानन राठोड (हिंगोली शहर वाहतूक शाखा) यांचा समावेश आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Help done regardless of life