लाॅकडाऊनमध्ये आरोग्यमंत्री टोपेंनी उचललं महत्त्वाच पाऊल

महेश गायकवाड
Friday, 1 May 2020

राज्यासह देशात सुरू असलेल्या लॉकडाऊन मुळे राज्याबाहेर अडकलेल्या मजुरांना आपल्या राज्यात आणण्यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

जालना : राज्यासह देशात सुरू असलेल्या लॉकडाऊन मुळे राज्याबाहेर अडकलेल्या मजुरांना आपल्या राज्यात आणण्यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याबाहेर चार ते पाच मजूर वेगवेगळ्या ठिकाणी काम करीत असतील अशा मजुरांना एकत्र आणून त्यांच्या साठी बस ची व्यवस्था काशी करता येईल या बाबत राज्य सरकार नियोजन करत असल्याची माहिती शुक्रवारी( ता.एक) आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात श्री टोपे यांच्या हस्ते मुख्य ध्वजवंदन करण्यात आले. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. श्री टोपे म्हणाले की, महाराष्ट्रातील जे मजूर परराज्यात अडकले आहे. त्यांना परत आणण्यासाठी शासन तयारीला लागले असून त्यांना बसद्वारे आणण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मोफत आरोग्य सेवा मिळाव्यात म्हणून महात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजने अंतर्गत येणाऱ्या 496 हॉस्पिटल मध्ये 977 आजारावर उपचार केले जात होते.राज्य सरकारने आशा हॉस्पिटलची संख्या वाढवून ती एक हजार केली आहे. या हॉस्पिटलच्या माध्यमातून राज्यातील 85 टक्के जनतेला उपचार घेता येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Helth Minister Rajesh Tope took New Decision Jalna News