esakal | निर्जंतुकीकरणासाठी खासदार हेमंत पाटील रस्त्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

Hemant patil

वसमत नगरपालिका प्रशासनातर्फे कर्मचारी जंतनाशकाची फवारणी करत असताना खासदार हेमंत पाटील यांनी पाहिले. त्यानंतर त्‍यांनी कर्मचाऱ्यांजवळील फवारणीचा पंप हातात घेत फवारणी कशी करावी, याचे प्रात्‍यक्षिक पंधरा ते वीस मिनिटे कर्मचाऱ्यांना करून दाखविले.

निर्जंतुकीकरणासाठी खासदार हेमंत पाटील रस्त्यावर

sakal_logo
By
पंजाब नवघरे

वसमत (जि. हिंगोली) : येथे पालिका प्रशासनातर्फे सुरू असलेल्या जंतनाशक फवारणी कामाची पाहणी नुकतीच खासदार हेमंत पाटील केली. या वेळी त्यांनी हातात फवारा घेत पंधरा ते वीस मिनिटे प्रभागात फवारणी केली. तसेच परिसरातील नागरिकांना कोरोना आजारासंदर्भांत दक्षता घेण्याचे आवाहन केले.

वसमत येथे शिवसेनेतर्फे मंगळवारी (ता. ३१) रक्‍तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्‍याचे उद्‍घाटन खासदार हेमंत पाटील यांच्या हस्‍ते झाले. या वेळी नगराध्यक्ष श्रीनिवास पोरजवार, शिवसनेचे उपजिल्‍हाप्रमुख सुनील काळे, जिल्‍हा परिषद सदस्य राजू चापके, शहराध्यक्ष काशिनाथ भोसले, बाबा अफुने, सोनू वाघमारे, विलास नरवाडे, मनोज चव्हाण, परमेश्वर चन्ने यांची उपस्‍थिती होती. या कार्यक्रमानंतर खासदार हेमंत पाटील यांनी शहरात पाहणी केली.

हेही वाचापोलिसांच्या मदतीला ‘राकाँ’चे पदाधिकारी धावले

कर्मचाऱ्यांना प्रात्‍यक्षिक करून दाखविले

 या वेळी त्‍यांनी प्रभाग दहामध्ये पाहणी केली असता तेथे पालिका प्रशासनातर्फे कर्मचारी जंतनाशकाची फवारणी करत असताना पाहिले. त्यानंतर त्‍यांनी कर्मचाऱ्यांजवळील फवारणीचा पंप हातात घेत पंधरा ते वीस मिनिटे फवारणी कशी करावी, याचे प्रात्‍यक्षिक कर्मचाऱ्यांना करून दाखविले. खासदार श्री. पाटील यांनी जिल्‍हाधिकारी, पोलिस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याकडून कोरोना विषाणूसंदर्भात उपाययोजनांची माहिती घेतली.

सेवा पुरविण्याचे शिवसैनिकांना आवाहन

 तसेच गरजूंना शिवसैनिकांमार्फेत सेवा पुरविण्याचे आवाहन केले. पोलिस व आरोग्य कर्मचारी यांना त्रास होईल असे वागू नका, अशा सूचनादेखील दिल्या. पालिका प्रशासनाचे काम पाहून त्यांनी समाधान व्यक्‍त केले. सार्वजनिक कामासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे अश्वासन त्‍यांनी दिले. या वेळी नगराध्यक्ष पोराजवार यांनीही शहरात स्वच्छता ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले. 

दुकानासमोर सोशल डिस्टन्सच्या रेषा

दरम्यान, कोणत्या प्रभागात कोणता भाजी विक्रेता भाजीपाला आणून देणार त्‍यांची नावे, मोबाइल नंबरची यादी व्हॉट्सॲप, फेसबुकवर टाकून नागरिकांपर्यंत पोचविण्यात आली आहे. मेडिकल, किराणा दुकानांसमोर सोशल डिस्‍टन्सच्या रेषा आखूण देण्यात आल्या आहेत. त्यानुसार नागरिक खरेदी करत असून स्वत:ची व कुटुंबीयांची काळजी घेत आहेत. प्रशासनाच्या सूचना पाळण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.

येथे क्लिक करा - आम्हाला आमच्या गावी जाऊ द्या; मजुरांचा आर्त टाहो

१४ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश लागू

वसमत : जीवनावश्यक वस्तू व सेवा पुरवठादारांमार्फत विक्री करण्यात येत असलेल्या ठिकाणी गर्दी होऊ नये, या दृष्टीने सेवा पुरवठा करण्याऱ्यांना ओळखपत्र देण्यात आले आहे. तसेच १४ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश लागू असल्याची माहिती तहसीलदार ज्‍योती पवार यांनी दिली. जमाबंदीचे आदेश असल्याने जीवनावश्यक वस्‍तू व सेवा पुरवठादार तसेच कर्मचारी, स्वंयसेवी संस्था, सेवाभावी संस्‍था यांना ओळखपत्र देण्यात येत आहे. वैद्याकीय कारणास्तव जिल्ह्याबाहेर जाण्या- येण्याची परवानगी देण्यात येत असून त्याकरिता वाजवी कारण व अभिलेखे सादर करावी लागणार आहेत.