esakal | आम्हाला आमच्या गावी जाऊ द्या; मजुरांचा आर्त टाहो
sakal

बोलून बातमी शोधा

jawala bazar photo

कनेरगाव येथील चेकपोस्‍टवर राजस्थानमध्ये जाणाऱ्या मजुरांना ताब्यात घेऊन त्‍यांना हिंगोली येथे ठेवण्यात आले होते. यामुळे प्रशासकीय यंत्रणेनेवरही मोठा ताण आला होता. या मजुरांपैकी १२७ मजुरांना सोमवारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांच्या वसतिगृहात स्थलांतरीत करण्यात आले आहे. 

आम्हाला आमच्या गावी जाऊ द्या; मजुरांचा आर्त टाहो

sakal_logo
By
संजय कापसे

कळमनुरी (जि. हिंगोली) : अनधिकृतपणे राजस्थानकडे जाणाऱ्या मजुरांना जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतल्यानंतर त्यातील १२७ मजुरांना सोमवारी (ता. ३०) कळमनुरी येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे. मात्र, या मजुरांनी गावाकडे जाण्याचा हट्ट कायम धरत प्रशासनासोबत असहकार धोरण अवलंबिल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत.

मागील तीन दिवसांपूर्वी कनेरगाव येथील चेकपोस्‍टवर राजस्थानमध्ये जाणाऱ्या मजुरांना ताब्यात घेऊन त्‍यांना हिंगोली येथे ठेवण्यात आले होते. यामुळे प्रशासकीय यंत्रणेनेवरही मोठा ताण आला होता. या मजुरांपैकी १२७ मजुरांना सोमवारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांच्या वसतिगृहात स्थलांतरीत करण्यात आले आहे. त्‍यानंतर तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे, पोलिस निरीक्षक रणजित भोईटे यांनी भेट देऊन पाहणी केली.

हेही वाचाहिंगोलीकरांना घरपोच मिळणार भाजीपाला

आरोग्य तपासणी

 त्यांना लागणारे आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता महसूल प्रशासनाने पुढाकार चालविला. उपजिल्हा रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद मेने व त्यांच्या पथकाने या सर्वांची आरोग्य तपासणीही केली. मात्र, मजुरांकडून आपणास आपल्या गावी जायचे आहे, हा हट्ट कायम ठेवत तेलंगणामधून आम्ही इथपर्यंत आलो. आम्हाला कुठेही अडवले नाही. तुम्ही आम्हाला त्रास देत आहात. 

जेवण घेण्यासही नकार

आम्हाला आमच्या गावी जाऊ द्या, असे म्हणत बहुतांश मजुरांनी प्रशासनाकडून देण्यात येत असलेल्या सुविधा नाकारल्या. अनेकांनी जेवण घेण्यासही नकार दिला. त्यामुळे या मजुरांशी कशा पद्धतीने वागावे, हेच आता प्रशासनामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुचेनासे झाले आहे. येथे स्थलांतरीत करण्यात आलेल्या मजुरांना जेवण, आरोग्य व इतर सुविधा देण्याकरिता प्रशासनाने प्रयत्न चालविले आहेत. त्यांना ठेवण्यात आलेल्या वसतिगृहाच्या बाहेर पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

सुविधा देण्याचा प्रयत्न

येथे आणण्यात आलेल्या सर्व मजुरांना आरोग्य व इतर मूलभूत सुविधा देण्याकरिता प्रशासनाने प्रयत्न केले आहेत. मात्र, मजुरांचा गावाकडे परत जाण्याचा हट्ट पाहता त्यांना समजावून सांगण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
-कैलासचंद्र वाघमारे, तहसीलदार

येथे क्लिक करागरजूंच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

८४ ऊसतोड कामगार ताब्यात

जवळा बाजार:  कोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोड कामासाठी गेलेल्या ८४ कामगारांना औंढा नागनाथ तालुक्‍यातील जवळा बाजार येथे ताब्यात घेतले असून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कोल्‍हापूर येथील ८४ ऊ:सतोड कामगार ट्रॅकमध्ये परभणी येथून कळमनुरीकडे जात होते. यात ३६ महिला, ३३ पुरुष, १५ लहान मुले तसेच शेळी, मेंढी, बकरी आदींचा समावेश होता. यात हिंगोली जिल्‍ह्यातीत काही; तर पुसद तालुक्‍यातील काही कामगारांचा समावेश आहे. त्‍यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. बलकेवार यांनी तपासणी केली.