अहो...आमच्या शैक्षणीक भवितव्याचे काय?  

File Photo
File Photo
Updated on

नांदेड : जागतिक महामारी करोनाने जगात थैमान घातले असून, त्याचा परिणाम आपल्या देशात त्याचबरोबर आपल्या राज्यात झाला आहे. या महामारीला रोखण्यासाठी देश तीन मेपर्यंत लॉकडाउन करण्यात आला आहे. लॉकडाउनच्या कालावधीत शासनाने सर्व वस्तीगृहे आरोग्य खात्याने ताब्यात घेतली आहेत. विद्यापीठ स्तरावरुन कुठलाही ठोस असा निर्णय होत नसल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढत असून, ‘आमच्या शिक्षणाचे काय होणार’? असा प्रश्‍न विद्यार्थी आणि संबंधीत संघटनेकडून उपस्थिती होत आहे.  

विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाबद्दल आणि परीक्षेसंदर्भात राज्य सरकराने ठोस निर्णय घ्यावा; यासाठी भास्कर डोईबळे, श्रीकांत जाधव यांनी सोमवारी (ता.२० एप्रिल २०२०) रोजी ई-मेलद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री, सर्व कुलगुरू यांना निवेदन देवून पदवी व पद्यव्युत्तरच्या विद्यार्थ्यांची नेमकी परीक्षा कधी होणार? याबाबत दिलासा देणारी माहिती द्यावी. तसेच विद्यार्थ्यांच्या भावनांचा सकारात्मक विचार करावा अशी विनंती या निवेदनात केली आहे.   

परीक्षेची चिंता अधिकच तीव्र 
परीक्षा संदर्भात योग्य निर्णय घेण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली. त्या समितीने निश्चित केलेला परीक्षेचा पॅटर्न मंजुरीसाठी आता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयास सादर करण्यात आल्याची माहिती विद्यार्थ्यांना मिळत असल्याने विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रमावस्था आहे. यामुळे परीक्षेबाबतची चिंता अधिकच तीव्र होताना दिसत आहे. विविध माध्यमातून परीक्षा ऑनलाइन होणार तर, दिल्ली विद्यापीठ विद्यार्थ्यांना प्रमोट करणार अशा उलटसुलट बातम्या येत आहेत.

परीक्षा नेमक्या कधी होणार
विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भात दररोज विविध माध्यमातुन उठणाऱ्या अफावांमुळे पालक आणि विद्यार्थी गोंधळलेल्या अवस्थेत आहेत.  त्यांचा मानसिक ताण दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत तातडीने निर्णय होणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रीया पालकवर्गातुन उमटत आहेत. ऑनलाइन परीक्षेसाठी आवश्यक ती साधने सर्व विद्यार्थ्यांना कशी उपलब्ध होतील? परीक्षा नेमक्या कधी होणार? विद्यार्थी कुठे राहणार? अशा स्वरूपाचे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत असून, तातडीने याविषयी मार्गदर्शन होणे आवश्‍यक आहे.   

विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार व्हावा-
१५ जूनला विद्यापीठाचे नवीन ॲकॅडमीक वर्ष सुरू होते. तेव्हा परिक्षा कधी आणि केव्हा होणार? विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेपेक्षा त्यांच्या जीविताला प्रधान्य देऊन गांभीर्यपूर्वक विचार करावा. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (यूजीसी) आग्रह धरून दीशा स्पष्ट करावी.  
- भास्कर डोईबळे (विद्यार्थी)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com