तापमानाच्या पाऱ्याची पुन्हा उसळी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

लातूर - पूर्व मोसमी पावसामुळे कमी झालेल्या कमाल तापमानाच्या पाऱ्याने उसळी मारली आहे. त्यामुळे शहरातील तापमानाचा पारा पुन्हा एकदा 41 अंश सेल्सियसपर्यंत पोचला आहे, तर पुढील आठवडाभर तापमान 41 ते 42 अंश सेल्सियसपर्यंत कायम राहण्याची शक्‍यता आहे. 

मागील आठवड्यातील ढगाळ वातारणामुळे तापमानात घट झाली होती. तसेच, अचानक आलेल्या पूर्व मोसमी पावसाने नागरिकांना शुक्रवारी (ता. 18) दिलासाही दिला होता; पण तापमानाचा पारा वाढल्याने आता पुन्हा एकदा नागरिकांना उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे. सकाळी नऊ वाजेपासून उष्णता जाणवू लागली आहे. दुपारच्या वेळेत तर उष्णतेची तीव्रता आणखी वाढत असल्याने शिवाजीनगर, गांधी चौक, बार्शी रस्ता, अंबाजोगाई रस्ता या प्रमुख भागांत शुकशुकाट जाणवू लागला आहे. घराबाहेर पडणारे नागरिक छत्री, रूमाल, टोपी, स्कार्फ, गॉगल असे साहित्य घेऊनच घराबाहेर पडत आहेत. 

केरळमध्ये 29 मे रोजी मान्सून दाखल होईल, तर जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात मान्सून सक्रीय होईल, असा अंदाज हवामान खात्याने नुकताच वर्तविला आहे. त्यामुळे उन्हाचा चटका सहन करणाऱ्या नागरिकांचे लक्ष आता मॉन्सूनकडे लागले आहे; पण पुढील तीन आठवडे उन्हाची तिव्रता सहन करावी लागणार आहे. सध्या नागरिक थंड वारे अनुभवण्यासाठी सायंकाळच्या वेळेत क्रीडा संकुल, विराट हनुमान मंदिर, अष्टविनायक मंदिर अशा ठिकाणी फिरायला जाताना दिसत आहेत. त्यामुळे या भागात रात्री उशिरापर्यंत चांगलीच गर्दी दिसत आहे.

Web Title: high temperature in latur