

Tarpaulin Slashed, Goods Stolen from Tempo; Swift Police Action Leads to Arrest
esakal
-दिलीप गंभिरे
कळंब: तालुक्यातील येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोलापूर-धुळे महामार्गावर उभ्या असलेल्या आयशर टेम्पोवरील ताडपत्री फाडून आतील साहित्य चोरी करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने अवघ्या एका दिवसात जेरबंद केले.आरोपीकडून चोरीस गेलेला १ लाख २३ हजार ३९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई रविवार (ता.22 ) करण्यात आली.