esakal | चाळीस रुपये डझन, काम मात्र लाखमोलाचे
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad news

स्वस्तात मस्त आणि वर्षभर मिळणारं फळ म्हणजे केळी. केळी खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण ऐन हिवाळ्यात कच्च्या केळीची मागणी का वाढते, हा औत्सुक्याचा विषय आहे.

चाळीस रुपये डझन, काम मात्र लाखमोलाचे

sakal_logo
By
टीम ई सकाळ

तसा केळीचा प्रमुख उपयोग हा खाण्यासाठीच केला जातो. पण आता केळीपासून वेफर्स, जॅम, भुकटी, पीठ, पेठा, केळाची दारू, ब्रॅन्डी, बिस्कीट असे अनेक पदार्थ बनवले जाऊ लागले आहेत. त्यामुळे या फळाला वर्षभर चांगली मागणी असते. 

स्वस्तात मस्त आणि वर्षभर मिळणारं फळ म्हणजे केळी. केळी खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण ऐन हिवाळ्यात कच्च्या केळीची मागणी का वाढते, हा औत्सुक्याचा विषय आहे.

का - युरिया खताचा कृत्रिम तुटवडा

साखर, प्रथिने, स्निग्धांश भरपूर असलेल्या केळीत चुना, लोह, स्फुरद ही खनिजं आणि क, अ ही जीवनसत्वंही असतात. एवढं सगळं असूनही पचायला फार सोपं असलेलं हे फळ आयुर्वेदिक दृष्टीने फार फायदेशीर असल्याचं वैद्य सांगतात. 

वाढलेले वजन कमी करण्यासाठी रोज एक कच्चे केळ खाण्याचा सल्ला अनेक डॉक्टर देतात. त्यामध्ये असलेल्या फायबरमुळे शरीरातली अनावश्यक चरबी झडायला मदत होते.

क्लिक करा - सोयाबीनचा दर्जा घसरला कशामुळे

कच्च्या केळीत फायबर आणि स्टार्च मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा समूळ नायमाट होतो. पोषक गुणांमुळे भुकेवर ताबा मिळवणे सुलभ होते. त्यामुळे जंकफूड खाण्यापेक्षा दोन केळी खाव्यात. 

मधुमेही असाल, आणि डायबिटीस प्राथमिक अवस्थेत असेल, तर कच्ची केळी खावी. त्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो. पचन प्रक्रिया सुधारते. कॅन्सरचा धोकाही कमी होतो आणि केळीतील कॅल्शिअममुळे हाडेही मजबूत होतात.

विशेष म्हणजे, निर्बल पुरुषांना स्टॅमिना वाढवण्यासाठी कच्ची केळी लाभदायक ठरते. हिवाळ्यात केळीचे सेवन केल्यास स्नायूंना बळकटी येते, असे आयुर्वेदिक वैद्यांनी सांगितले आहे. 

आयुर्वेदात कच्च्या केळीचे फार फायदे सांगितले आहेत, असं म्हणतात. त्यामुळे सामान्य ग्राहकही कच्ची केळी खरेदी करू लागले आहेत. शिवाय वेफर्स बनवणारे व्यावसायिकही आता कच्ची केळी मोठ्या प्रमाणात खरेदी करू लागले आहेत. औरंगाबादच्या बाजारात दिवसाकाळी साधारण सहाशे ते सातशे क्विंटल केळी विकली जात होती. आता हिवाळ्यात हे प्रमाण एक ते दीड टनांपर्यंतही जाते. 
- सोहेल बागवान, केळीचे ठोक विक्रेते

loading image