भाजपा पुन्हा आली तर हिंदू-मुस्लिम वाद वाढतील : कन्हैय्याकुमार 

अनिल जमधडे 
रविवार, 26 ऑगस्ट 2018

कन्हैय्याकुमार मराठवाड्याच्या दौऱ्यावर आलेले असताना, दिल्लीला जाण्यापुर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की ज्या संविधानावर देश उभा आहे, ते संविधान दिल्लीमध्ये राजरोसपणे जाळले जाते. सरकार त्यावर काहीही कारवाई करत नाही.

औरंगाबाद : देशाचे संविधान वाचवणे हेच खरे आजचे अव्हान आहे. भाजपा पुन्हा सत्तेत आली तर मुख्य प्रश्‍न बाजूला पडतील आणि हिंदू-मुस्लिम दंगे वाढतील. जातीपातीचे राजकारण वाढेल, म्हणून संविधानाला मानणाऱ्या वर्गाने एकत्र आले तर भाजपला हरवणे अवघड नाही. असा ठाम विश्‍वास जेएनयु विद्यापीठाचे विद्यार्थी नेते डॉ. कन्हैय्याकुमार यांनी व्यक्त केला. 

कन्हैय्याकुमार मराठवाड्याच्या दौऱ्यावर आलेले असताना, दिल्लीला जाण्यापुर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की ज्या संविधानावर देश उभा आहे, ते संविधान दिल्लीमध्ये राजरोसपणे जाळले जाते. सरकार त्यावर काहीही कारवाई करत नाही. ही गंभीर बाब असून, संविधान वाचवणे हे आज देशापुढे अव्हान आहे. भाजपाला केवळ 31 टक्के लोकांनी मत दिलेले आहेत. बाकी सर्वांनी एकत्र आले तर भाजपचा पराभव निश्‍चित आहे. हिंदूत्व आणि हिंदूवादी यात फरक आहे. भाजप हिंदुत्वाच्या नावाखाली हिंदु धर्माला मानणाऱ्यांच्या भावना भडकावून राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केले. यावेळी डॉ. भालचंद्र कांगो, प्रा. राम बाहेती, अभय टकसाळ यांची उपस्थिती होती.  

Web Title: Hindu Muslim disputes will increase if BJP reregain power says Kanhaiyyakumar