औरंगाबादमध्ये उद्या हिंदू शक्ती मोर्चा - खैरे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

औरंगाबाद - दंगलीनंतर पोलिस हिंदूंचे रक्षण करणाऱ्या शिवसैनिकांनाच टार्गेट करीत असून, एमआयएमचा दंगेखोर नगरसेवक अद्याप मोकाट आहे. आमचा पोलिस, गृह खात्यावर विश्‍वास राहिलेला नाही, एकतर्फी कारवाई शिवसेना खपवून घेणार नाही, असा इशारा शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी गुरुवारी दिला.

पोलिसांच्या निषेधार्थ शनिवारी (ता. १९) जिल्हाधिकारी कार्यालयावर हिंदू शक्ती मोर्चा काढण्यात येणार असल्याचे खैरे यांनी या वेळी जाहीर केले. शहरात शुक्रवारी घडलेल्या दंगलीनंतर पोलिसांनी शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ व कार्यकर्ते लच्छू पहिलवान ऊर्फ लक्ष्मीनारायण बाखरिया यांना अटक केल्याच्या पार्श्‍वभूमीवर खैरे म्हणाले, की दंगलीत दगड समोरून येत होते. पेट्रोल बॉम्ब, रॉकेलचा वापर केला गेला. त्यामुळे दंगल पूर्वनियोजित होती. शिवसैनिकांनी संकटात सापडलेले हिंदू नागरिक व पोलिसांचेही संरक्षण केले. मात्र, आता पोलिस शिवसैनिकांवरच उलटले आहेत.

Web Title: Hindu shakti morcha in aurangabad chandrakant khaire