
हिंगोली : नर्सी रोडवरील अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यु
हिंगोली : तालुक्यातील नर्सी नामदेव ते सेनगाव रोडवर बाहेती पेट्रोल पंपाच्या समोर क्रुझर जीप वाहनाची दुचाकीस धडक (Accident) बसल्याने दुचाकीवरील महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू (College Student Death) झाल्याची घटना शनिवारी ता.१८ सकाळी घडली आहे.
हिंगोली तालुक्यातील जांभरून आंध येथील एकनाथ हरिभाऊ जुमडे वय १८ वर्ष हा हिंगोली येथे इयत्ता बारावी मध्ये शिक्षण घेत असून तो नेहमीप्रमाणे हिंगोली येथे महाविद्यालयांमध्ये आपल्या एम एच ३८ वाय ०६३० या दुचाकीवरुन जात होता. त्याची दुचाकी पेट्रोल पंपाच्या समोर रोडवर येत असताना हिंगोली येथून सेनगावकडे जात असलेल्या क्रुझर जीप एम एच ३८-७१९७ या वाहनाची जोराची धडक बसली.
हेही वाचा: शिवपुतळा विटंबना निषेधार्थ संकेश्वरला निषेध फेरी
यात दुचाकीवरील एकनाथ जुमडे हा तरुण अपघातात जब्बर जखमी झाला. त्याला नर्सी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक कांबळे, गणेश जाधव यांनी जखमीस वाहनांमध्ये टाकून प्रथम नर्सी आरोग्य केंद्रात घेऊन गेले मात्र हे आरोग्य केंद्र बंद असल्याने हिंगोली येथे उपचारासाठी नेत असताना सदरील जखमीचा वाटेतच मृत्यू झाला आहे.
Web Title: Hingoli Accident College Student Death
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..