हिंगोली : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, जिल्ह्यात सहा लाख ६० हजार ७११ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

file photo
file photo

हिंगोली : जिल्ह्यात ग्रामपंचायतच्या होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीची शुक्रवारी (ता. १५)  मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी प्रशासनाची पुर्ण झाली असून जिल्ह्यात ४९५ पैकी ७३ ग्रामपंचायत बिनविरोध निवडल्याने आता ४२२ ग्रामपंचायतसाठी सहा लाख ६० हजार ७११ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

दरम्यान, गुरुवारी (ता. १४) मतदान केंद्रावर साहित्य पाठवण्यासाठी तहसीलच्या प्रांगणात मंडप उभारून गाव निहाय टेबल लावण्यात आले असून या टेबलवरून अधिकाऱ्यामार्फत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना मतदान यंत्रासह मतदानाचे साहित्य वाटप करण्यात आले आहे. शुक्रवारी सायंकाळी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याच टेबलावर मतदान यंत्रासह साहित्य जमा करायचे आहे. अशी व्यवस्था सर्वच तहसील प्रशासनाकडून प्रथमच करण्यात आली आहे.

जिल्ह्यात ४९५ ग्रामपंचायतसाठी एक हजार ६०० मतदान केंद्रात मतदान प्रक्रिया घेण्यात येत आहे. यापैकी ७३ ग्रामपंचायत बिनविरोध निवडल्या गेल्याने आता ४२२ ग्रामपंचायतसाठी  शुक्रवारी मतदान होत आहे. यामध्ये सहा लाख ६० हजार ६११ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये तीन लाख ४६ हजार ६८ पुरुष  तर तीन लाख १४ हजार ६४२ महिलांचा समावेश आहे. 

दरम्यान जिल्ह्यात ७३ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. यात हिंगोली तालुका १७, कळमनुरी १५, सेनगाव १६, औंढा १६ वसमत ९ ग्रामपंचायतचा समावेश आहे.  ग्रामपंचायतच्या निवडणूकीसाठी  त्यासाठी प्रशासन पूर्ण तयारी झाली आहे.मतदान केंद्रावर साहित्य पाठवण्यासाठी तहसीलच्या प्रांगणात मंडप उभारून गाव निहाय मतदान साहित्य लावण्यात आले या टेबलरून अधिकाऱ्यामार्फत यंत्रासह मतदानाचे साहित्य वाटप करण्यात आले.

मतदान प्रक्रियेच्या काळात गुंडागर्दी केल्यास कठोर कारवाई करणार, पोलिस अधीक्षक कलासागर यांचा इशारा

हिंगोली,:  जिल्ह्यातील ४९५ ग्रामपंचायतीसाठी निवडणुक होत असून शुक्रवारी  मतदान प्रक्रिया होणार आहे. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाकडून मतदानाच्या दिवशी पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील १, २७६ बुथवर सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० मतदान होणार आहे. निवडणूक दरम्यान गुंडागर्दी केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यानी दिला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी १५ जानेवारी मतदानाच्या दिवशी तसेच १८ जानेवारी मतमोजणीच्या दिवशी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी दिली. याबाबत संबंधित पोलिस ठाण्याच्या ठाणेदारांना आवश्यक सूचना देत कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील सर्व ठाणेदार तसेच गोपनीय विभागातील अधिकारी,कर्मचारी व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी बैठक घेऊन मार्गदर्शन केले. निवडणूक दरम्यान गुंडागर्दी केल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. विशेष म्हणजे निवडणूक बंदोबस्त करिता रेल्वे पोलीस कर्मचारी, एसआरपीएफ कर्मचारी व होमगार्ड असा फौजफाटा तैनात असणार आहे. तसेच स्वतंत्र वाहने व छायाचित्रीकरण देखील केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com