Hingoli : २५ गावांना मिळणार ऑक्सिजनमधून संजीवनी

हिंगोली जिल्ह्यातील चित्र; जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचा पुढाकार
Hingoli
Hingolisakal

हिंगोली : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात वृक्ष लागवड मोहीम राबवली जात आहे. पाच तालुक्यांतील प्रत्येकी पाच गावांमध्ये किमान २५ हजार वृक्ष लागवड करून या गावांना ऑक्सिजनमधून संजीवनी मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने यासाठी पुढाकार घेतला असून, गावपातळीवर सर्व यंत्रणांना यामध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे.

हिंगोली जिल्ह्यात दाटेगाव ग्रामपंचायतीने स्मशानभूमीतही बाग फुलवली आहे. या गावामध्ये विविध फळे व फुलांची झाडे लावण्यात आली असून, गाव हिरवाईने नटले आहे. या गावाच्या धर्तीवरच वृक्ष लागवड योजनेअंतर्गत प्रत्येक तालुक्यातील पाच गावे या प्रमाणे २५ गावांमध्ये किमान २५ हजार वृक्ष लागवड करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. सीईओ संजय दैने यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे.

स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा, आरोग्य उपकेंद्र या सोबतच इतर शासकीय कार्यालयांच्या मदतीने वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवला जात आहे. त्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने रोपे उपलब्ध करण्यात आली आहेत. या उपक्रमात गावकऱ्यांचाही सहभाग असून, गावातील प्रत्येक कुटुंबाला काही झाडे दत्तक देऊन त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी सदरील कुटुंबावर देण्यात आली आहे. यातून रोपांची वाढ होऊन गाव हिरवाईने नटणार आहे.

ग्रामस्थांवर जबाबदारी

लागवड झालेल्या रोपांचे प्राण्यांकडून नुकसान होऊ नये, यासाठी लोकसहभागातून जाळ्या बसविल्या जात आहेत. या सोबतच उन्हाळ्यामध्ये रोपांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन बसवले जाणार आहे. त्यासाठी कृषी विभागाची मदत घेतली जाणार आहे. रोपे गावकऱ्यांना दत्तक दिली जाणार असून, त्या रोपांचे संपूर्ण संगोपन करण्याची जबाबदारी गावकऱ्यांवर सोपवली आहे.

वृक्षांचे संगोपन करणाऱ्या गावांना पारितोषिक

ऑक्सिजन संजीवनीसाठी निवडलेल्या २५ गावांमधून विद्यार्थ्यांची फेरी काढून गावकऱ्यांना वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. क्षेत्रीय पातळीवरील कर्मचारी देखील या उपक्रमात सहभागी झाले आहेत. वृक्षांचे संगोपन करणाऱ्या गावांना पारितोषिक दिले जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com