Hingoli : बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये उबारेंचा प्रवेश

उबारे हे मागील पंधरा ते वीस वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते होते
MLA Santosh Bangar
MLA Santosh Bangarsakal

वसमत : येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक यशवंतराव बाबाराव उबारे यांनी शनिवारी (ता. तीन) हिंगोली येथे आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीमध्ये बाळासाहेबांची शिवसेनेमध्ये प्रवेश केला. ते मागच्या पंचवार्षिकमध्ये वसमत नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते. त्यांचा निसटता प्रभाव झाला होता.

उबारे हे मागील पंधरा ते वीस वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांच्या प्रवेशामुळे बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाची ग्रामीण भागासह शहरी भागात ताकद वाढली आहे. यावेळी तालुकाप्रमुख राजू चापके, माजी सभापती राजू इंगोले उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात तालुका प्रमुख राजू चापके यांच्या सोबतीने वसमत विधानसभेमध्ये पक्ष वाढविण्यासाठी काम करीन. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजप व बाळासाहेबांच्या शिवसेना युतीचा भगवा फडकेल.

- यशवंतराव उबारे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com