
हिंगोली जिल्ह्यात एक रुग्ण पॉझीटिव्ह आढळल्याच्या घटनेनंतर तीन दिवसांनी सोमवारी दोघांचे अहवाल निगेटिव्ह तर दोघांचे अहवाल प्रलंबित आहेत. यामुळे काहीसा दिलासा हिंगोलीकरांना मिळाला आहे.
हिंगोली ः जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘कोरोना’ संशयितांसाठी तयार केलेल्या आयसोलेशन वार्डात सोमवारपर्यंत (ता.सहा) पाच कोरोना संशयित रुग्ण भरती आहेत. यापैकी दोघांचा अहवाल निगेटिव्ह तर दोघांचा अहवाल प्रलंबित आहे. तर यापैकी एकाचा अहवाल या अगोदरच पॉझीटिव्ह आल्याची माहिती डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली.
पाच संशयितांपैकी पहिला रुग्ण (वय ४९) ज्याचा अहवाल गुरूवारी (ता.दोन) औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पॉझीटिव्ह आला आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. दुसरा कोरोना संशयित (वय ४०) हा कोवीड रुग्णाच्या निकटतम सहवासामधील व्यक्ती आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. या व्यक्तीचा अहवाल निगेटीव्ह आहे. तसेच तिसरा संशयित (वय ४७) हा संशयित कोरोना संसर्ग असलेल्या शहरातून आला असून त्याला फ्ल्यु सारखी लक्षणे आहेत. त्याचा अहवाल निगेटिव्ह आहे. चौथा व्यक्ती (वय ३८) हा संशयित कोरोना संसर्ग असलेल्या शहरातून आला असून त्याला फ्ल्यू सारखी लक्षणे आहेत. त्याची प्रकृती स्थिर आहे. याचा अहवाल प्रलंबित आहे.
हेही वाचा - तर सुरु ठेवणार खाजगी दवाखाने, कुठे ते वाचा...
अकरा व्यक्तींचा होम क्वॉरंटाइनचा कालावधी संपला
पाचवा व्यक्ती (वय २९) कोवीड रुग्णांच्या निकटतम सहवासातील व्यक्ती आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. याचा अहवाल प्रलंबित आहे. दरम्यान, जिल्ह्यात परदेशातून आलेल्या व घरातच अलगीकरण करण्यात आलेल्या सर्व ११ व्यक्तींचा १४ दिवस होम क्वॉरंटाइनचा कालावधी संपला आहे. येथील आयसोलेशन वार्डात भरती केलेल्या रुग्णांची संख्या २० आहे. पॉझीटीव्ह आलेला एक रुग्ण तर निगेटिव्ह रुग्णांची संख्या १७ आहे. आयसोलेशन वार्डात भरती असलेल्या व रिपोर्च प्रलंबित असलेल्या रुग्णांची संख्या दोन असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली.
हेही वाचा - ‘या’ जिल्ह्यात १२ एप्रिलपासून मोफत तांदुळ होणार उपलब्ध
सतरा रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह
येथील आयसोलेशन वार्डात भरती करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या २० आहे. कोवीड पॉझीटिव्ह आलेला एक रुग्ण आहे तर निगेटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या १७ असून आयसोलेशन वार्डातून डिस्चार्ज केलेल्या एकूण रुग्णांची संख्या १७ आहे. शासकीय क्वॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलेल्या एकूण व्यक्तीची संख्या नऊ आहे. तर आयसोलेशन वार्डातून भरती असलेल्या व रिपोर्ट प्रलंबित असलेल्या रुग्णांची संख्या दोन असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली.