esakal | महाराष्ट्राला हादरवणारी हिंगोली ब्रेकिंग : मालेगाव, मुंबईत ड्यूटी केलेल्या २५ जवानांना कोरोना
sakal

बोलून बातमी शोधा

Hingoli News

मालेगाव आणि मुंबईत बंदोबस्तावर गेलेल्या एसआरपीएफच्या तब्बल २५ जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या धक्कादायक बातमीमुळे आता हिंगोलीचा कोरोना बाधितांचा आकडा ४७ वर गेला आहे. 

महाराष्ट्राला हादरवणारी हिंगोली ब्रेकिंग : मालेगाव, मुंबईत ड्यूटी केलेल्या २५ जवानांना कोरोना

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : मालेगाव आणि मुंबईत बंदोबस्तावर गेलेल्या एसआरपीएफच्या तब्बल २५ जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या धक्कादायक बातमीमुळे आता हिंगोलीचा कोरोना बाधितांचा आकडा ४७ वर गेला आहे. 

हिंगोली जिल्हयात एकूण ४७ व्यक्तींना कोविड - १९ ची लागण झाल्याचे शुक्रवारी (ता. १) अहवालातून स्पष्ट झाले आहे. यातील १ रुग्ण बरा होवून निगेटीव्ह झाल्यामुळे डिस्चार्ज झालेला आहे. 

एसआरपीएफ, हिंगोलीच्या २५ जवानांचे आज सकाळी नव्याने अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. यातील २० जवान क्वॉरंटाईन सेंटर (एसआरपीएफ) मध्ये भरती आहेत व ५ जवान आयसोलेशन वार्डमध्ये भरती आहेत. या सर्व जवानांचे अहवाल पूर्वी निगेटीव्ह आले होते. एकूण एसआरपीएफच्या ४१ जवानांना आतापर्यंत कोव्हीड - १९ ची लागण झाल्याने स्पष्ट झाले आहे. कोरोनाची लागण झालेल्या ४१ पैकी ३३ जवान मालेगांव येथे व ८ जवान मुंबई येथे कार्यरत होते. 

सहा महिन्यांच्या बाळाचे शिर कापून फेकले, कुत्र्याने पळवले

तसेच, हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापुर येथील २५ वर्षांच्या खासगी ट्रॅव्हल्सवर कार्यरत असलेल्या तरुणालाही कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे. तो २३ एप्रिल रोजी भाविकांना सोडण्यासाठी नांदेड येथून पंजाब येथे गेला होता. २८ एप्रिलला नांदेड येथे परतल्यानंतर त्याला शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयात क्वॉरंटाईन करण्यात आले होते. त्याचा अहवाल आज सकाळी पॉझीटीव्ह आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

संशयित आरोपीच कोरोनाग्रस्त, औरंगाबादेत ३० पोलिस क्वारंटाईन

आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात एकुण ४७ कोव्हीड - १९ चे रुग्ण झाले आहेत. त्यातील १ व्यक्ती बरा होऊन निगेटीव्ह झाल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. सध्या जिल्ह्यात एकूण ४६ रुग्ण पॉझीटीव्ह आहेत, त्यातील १ रुग्ण शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालय नांदेड येथे अॅडमीट आहे व १ रुग्ण धूत हॉस्पीटल, औरंगाबाद येथे अॅडमीट आहे. तर ४५ रुग्ण हिंगोली येथे उपचाराखाली आहेत. 

loading image
go to top