हिंगोली : धारखेडा येथे हळदीच्या पिकात गांजाची झाडे

file photo
file photo

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील  धारखेडा  येथील शेत शिवार गट क्रमांक ३८ मध्ये हळदीच्या पिकात गांजाची ८४ हजार रूपयाची १०८ झाडे आढळून आली असुन  रविवारी ता. १३ घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार औंढा नागनाथ तालुक्यातील धारखेडा येथील एका शेतात गांजाची झाडे असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना कळली होती. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता येथील सखुबाई  साबळे यांची शेती वहिती करणारा वसंता पंडित कराळे राहणार धारखेडा याने आपले कापूस व हळदीच्या पिकांमध्ये एकूण १०८ गांजाची लहान मोठी झाडे अवैधरित्या लागवड केल्याचे आढळून आले.

त्याची किंमती ८४ हजार रुपये

सदर घटनास्थळावर एलसीबीचे पथक व औंढा येथील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन खात्री केली. सदर झांडांचे एकूण वजन १६. ८२० ग्रँम भरले त्याची किंमती ८४ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत पुढील  कार्यवाही सुरू आहे.

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, यांचे मार्गदर्शनाखाली  पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार , पोलीस उपनिरिक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, महिला पोउपनी श्रीमती वाळके, बालाजी बोके, विलास सोनवणे,भरत घ्यार, भगवान आडे,सुनील अंभोरे, शंकर ठोंबरे, विठ्ठल कोळेकर, किशोर सावंत,दिपक पाटील, आकाश टापरे, विठ्ठल काळे, सचीन मस्के, ओंमकार राजनेकर यांनी केली आहे. 

चौघाविरुद्ध गुन्हा दाखल केला

दरम्यान शनिवारी देखील पोलिसांनी औंढा तालुक्यातील उमरा  व वसमत तालुक्यातील हट्टा पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या नहाद येथे  एका गावात शेतात तुरीच्या पिकांत लावलेली गांजाच्या झाडे जप्त करून चौघाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com