हिंगोली : जिल्ह्यातील ढगाळ वातावरणाचा तूर, हरभरा पिकांना धोका 

राजेश दारव्हेकर
Friday, 18 December 2020

जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी तुरीवर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे  मागच्या आठवड्यापासून वातावरणात बदल झाला आहे.   

हिंगोली : जिल्ह्यात मागच्या चार ते पाच दिवसापासून तापमानात घट झाली आहे. कमाल तापमान २५ अंश सेल्सीअसवर आले आहे. ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने गहू, तूर तसेच हरभरा पिकांना धोका निर्माण  झाला आहे. 

जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी तुरीवर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे  मागच्या आठवड्यापासून वातावरणात बदल झाला आहे. यावर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांमध्ये अतिवृष्टीने कापूस, सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटकात सापडले आहेत. यावर्षी रब्बी हंगामातील पिकासाठी मुबलक प्रमाणात पाणी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभरा पिकांचा पेरा वाढविला आहे. 

हेही वाचाSuccess Story:नांदेडमध्ये पहिल्यांदाच स्ट्रॉबेरीची लागवड, डेरला येथील अर्जुन जाधव यांचा यशस्वी प्रयत्न -

खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस हातचे गेले असले तरी रबी हंगामातील पिके साथ देतील, अशी अशा शेतकऱ्यांना आहे. सध्या ढगाळ वातावरणामुळे अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. ढगाळ वातावरण काही दिवस राहील असे कृषी विभागातर्फे सांगितले जात आहे.  

जिल्ह्यातील  यावर्षी रब्बी हंगामातील गहू पिकाचा पेरा १६ हजार ९९५ हेक्टर, ज्वारी ९ हजार १९९, हरभरा ५५ हजार ५८३, मका १९३, करडई १०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांनी औषधाची फवारणी करावी व पिकाची योग्य ती काळजी घ्यावी असा सल्ला  कृषी विभागातर्फे देण्यात आला आहे.

 

संपादन-  प्रल्हाद कांबळे

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Cloudy weather in the district, threat to gram crops hingoli news