Hingoli Constituency Lok Sabha Election Result: हिंगोलीत भाजप कार्यकर्त्यांची नाराजी आष्टीकरांच्या पथ्थ्यावर; कोहळीकरांचा पराभव

Hingoli Lok Sabha Election Result 2024 Shivsena Baburao Kohlikar defeated Shivsena UBT Nagesh Patil Ashtikar wins : या ठिकाणी बाबुराव कोहळीकर विरुद्ध नागेश पाटील आष्टीकर अशी लढत झाली.
Hingoli Constituency Lok Sabha Election Result: हिंगोलीत भाजप कार्यकर्त्यांची नाराजी आष्टीकरांच्या पथ्थ्यावर; कोहळीकरांचा पराभव

Hingoli Lok Sabha Election Result 2024 : हिंगोली लोकसभा मतदारसंघात भाजपच्या अंतर्गत नाराजीचा फटका शिंदेंचे उमेदवार बाबूराव कोहळीकर यांना बसल्यानं त्यांचा पराभव झाला आहे. तर ठाकरे सेनेचे नागेश पाटील-आष्टीकर हे विजयी झाले आहेत.

कधीकाळी काँग्रेस पक्षाचा गड मानला गेलेला हा मतदारसंघ अलीकडे शिवसेनेचा बालेकिल्ला बनला आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर हिंगोलीतही शिवसेनेचे दोन उमदेवार यंदा आमनेसामने आहेत. महायुतीकडून अर्थात शिंदे गटाकडून बाबुराव कोहळीकर तर महाविकास आघाडीकडून अर्थात ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर हे होते. पण या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसत असल्यानं कोहळीकरांना कशा प्रकारे मतदान होतं? अशी चर्चा सुरु होती.

यंदा किती झालं मतदान?

हिंगोली लोकसभेसाठी यंदा १८.१७ लाख मतदारांपैकी ११.५४ लाख मतदारांनी मतदान केलं, त्यामुळं यंदा इथं ६३.५४ टक्के मतदान झालं. मतदान चांगलं झाल्यानं खरंतर कोणाला याचा फायदा होतो हे पाहावं लागणार आहे.

२०१९ मध्ये अशी होती स्थिती?

हेमंत पाटील (शिवसेना) विजयी मते : ५,८६,३१२

सुभाष वानखेडे (काँग्रेस) मते : ३,०८,४५६

मोहन फत्तेसिंह राठोड (वंचित) मते : १,७४,०५१

संदेश रामचंद्र चव्हाण (अपक्ष) मते : २३,६९०

विजयी उमेदवाराचे मताधिक्य : २,७७,८५६

यंदाच्या निवडणुकीत गाजलेले मुद्दे

सिंचन व्यवस्थेचा अभाव

जनशताब्दी एक्स्प्रेस, मेडिकल कॉलेजवरून राजकारण

मराठा आरक्षणाचा मुद्दा

उद्योग, रोजगाराचा प्रश्न कळीचा मुद्दा ठरणार

शेतमाल दराच्या मुद्द्यावरून सरकारची कोंडी शक्य

आरोग्य सुविधांची वानवा

विधानसभा क्षेत्रात झालेलं मतदान

बसमथ - ६२.५४ टक्के

हडगाव - ६५.५३ टक्के

हिंगोली - ५९.९२ टक्के

कलमुनुरी - ६३.६० टक्के

किनवट - ६५.८६ टक्के

उमरखेड - ६४.३७ टक्के

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com