esakal | हिंगोली : कोरोना व अतिवृष्टिचे, ऑनलाइन खरेदीवर नागरिकांचा कल, सेनगावातील चित्र
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

दिवाळी सण अवघ्या तीन दिवसांवर आला आहे. दरवर्षी दिवाळी निमित्त आठ ते दहा दिवस अगोदर पासून बाजार पेठ फुललेली असते. अनेक जन नवीन कपडे खरेदीसाठी शहरातील कापड दुकानावर मोठी गर्दी करत असतात.

हिंगोली : कोरोना व अतिवृष्टिचे, ऑनलाइन खरेदीवर नागरिकांचा कल, सेनगावातील चित्र

sakal_logo
By
विठ्ठल देशमुख

सेनगाव (जिल्हा हिंगोली) : दिवाळी सन जवळ आला की शहरात ग्रामीण भागातुन येणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी होते. परंतु यंदा कोरोनातुन जरी मोकळा श्वास घेता आला असला तरी परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठे झालेले असताना ऑनलाइन खरेदीकडे नागरिकांचां कल दिसून आहे. यामुळे स्थानिक व्यवसायीकांवर मोठा गंभीर परिणाम झालेला पहायला मिळत आहे. 

दिवाळी सण अवघ्या तीन दिवसांवर आला आहे. दरवर्षी दिवाळी निमित्त आठ ते दहा दिवस अगोदर पासून बाजार पेठ फुललेली असते. अनेक जन नवीन कपडे खरेदीसाठी शहरातील कापड दुकानावर मोठी गर्दी करत असतात. तर काही जन सोने चांदी खरेदी करीता बाजार शहरातील पेठेत मोठी गर्दी होते. मुलीचे लग्न झाले की, पहिली दिवाळी ही मुलीच्या माहेरी तिच्या वडीलांकडुन मुलीला व जावायाला कपडे खरेदी करून मोठा उत्सव साजरा करण्याची परंपरा असते. परंतु यंदा कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे व अतिवृष्टिमुळे पिकांचे नुकसान झाल्याने सेनगाव शहरातील सर्वात मोठ्या बाजार पेठेत शुकशुकाट दिसून येत आहे. यावर्षी कोरोना व दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे संकटांना सामोरे जात आहे. त्यामुळे स्थानिक व्यवसायांवर देखील याचे मोठे गंभीर परिणाम झाले असून बाजार पेठेत शुकशुकाट पहायला मिळत आहे.

हेही वाचा - हिंगोली : दोन वर्षापासून परिवारापासून ताटातूट झालेल्या युवकाचा शोध लावण्यास यश-  रणजीत भोईटे 

ऑनलाइन खरेदीकडे नागरिकांचा कल कोरोना काळात सर्व व्यवसाय बंद असताना सरकारने ऑनलाइन खरेदी सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ऑनलाइन नागरिकांनी देखील याचा पुरेपुर फायदा घेतलेला पहायला मिळते. दसरा झाला आणि दिवाळी आली. व याच दिवाळी सनाचे औचित्य साधुन अनेक जन मोबाईल, कपडे, शूज व इतर वस्तु मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. विविध ॲपद्वारे शहरासह ग्रामीण भागातील ऑनलाइन वस्तु मोठ्या प्रमाणात खरेदी सुरु आहे. या ॲपच्या कंपनीकडून दिवाळी निमित्त ऑफर ठेवली जात आहे. यामुळे नागरिकांनी ऑनलाइन खरेदीवर भर दिली आहे. यामुळे स्थानिक व्यवसायावर याचे मोठे गंभीर परिणाम होत आहेत. सेनगाव शाहरातील बाजार पेठेत सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. यामुळे स्थानिक व्यवसायीकांवर मोठे आर्थिक संकट आलेले पहायला मिळत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे