esakal | हिंगोलीत कोरोनाचा कहर सुरूच : रविवारी ४७ रुग्णांची भर, ५६ रुग्णांना डिस्चार्ज
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

४७ कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत व ५६ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

हिंगोलीत कोरोनाचा कहर सुरूच : रविवारी ४७ रुग्णांची भर, ५६ रुग्णांना डिस्चार्ज

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : रविवारी (ता. दोन) हिंगोली जिल्ह्यामध्ये नव्याने एकूण ४७ कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत व ५६ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती डाँ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली.

हिंगोली येथील छत्रपतीनगर येथील एक ५६ वर्षीय पुरुष,  गव्हर्नमेंन्ट क्वॉर्टर येथील ३६ वर्षीय पुरुष, पलटन येथील ४८ वर्षीय स्त्री, तोफखाना येथील पाच वर्षीय बालिका, गाडीपूरा येथील ५२ वर्षीय पुरुष, काजीपुरा २३ वर्षाचा पुरुष, १५ वर्षीय मुलगा. कृष्णा मेडिकल जवळील ६० वर्षाचा पुरुष. तलाबकट्टा   येथील १३ वर्ष मुलगा, पेन्शनपुरा येथील ३२ वर्षाचा पुरुष,  ४०, ३० वर्षाची स्त्री, १२ वर्षाचा मुलगा, १६ वर्षाची मुलगी, भोईपुरा येथील १८ वर्षाचा पुरुष,  नाईकनगर ३५ वर्षाचा पुरुष, हरण चौकातील ३२ व २० वर्षाचा पुरुष, आझम कॉलनी २६ वर्षाची स्त्री, दत्त मंदीर , ५३ स्त्री , ३२ वर्षाचा पुरुष, रामगल्ली  ६८ वर्षाचा पुरुष, मस्तानशहा ४५ वर्ष स्त्री, २२ वर्षाचे दोन, १९ वर्षाची स्त्री, जगदंब हॉस्पीटल ३६ वर्षाचा पुरुष आहे.

येथील आहेत बाधीत रुग्ण

कळमनुरी येथील  बुरसे गल्ली ६० वर्षाची स्त्री, ४४ वर्षाचा पुरुष, ४१ वर्ष स्त्री तसेच २८ वर्ष पुरुष, ४१ स्त्री, ३८ पुरुष, १० वर्षाची मुलगी, सहा वर्षाचा मुलगा यांचा समावेश आहे. हिंगोली येथील श्रीनगर येथील ७० व ४० वर्षाची स्त्री, ४५ वर्षाचा पुरुष, २१ वर्षाचे दोन पुरुष व १४ वर्षाची स्त्री, वरुडचक्रपान येथील ५५ वर्षाची स्त्री, गंगानगर येथील ३६ वर्षाचा पुरुष, गोरेगाव येथील ५० वर्षाचा पुरुष आहे. तसेच काबरा जिनिंग जवळील ३४ वर्षाचा पुरुष, कळमनुरी शहरातील २५ वर्षाचा पुरुष आहे.

हेही वाचारक्षाबंधनदिन विशेष : बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन

५६ कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज

रविवारी (ता. दोन) रोजी ५६ कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज करण्यात आले आहे. यामध्ये कोरोना केअर सेंटर कळमनुरी ( तीन कोरोना रुग्ण ), तीन आखाडा बाळापुर येथील आहेत. कोरोना केअर सेंटर लिंबाळा ( १४ कोरोना रुग्ण ) यात चार आझम कॉलनी , तीन रिसाला बाजार , दोन श्रीनगर , तीन मंगळवारा , एक वायचाळपिंप्री , एक नगर परिषद येथील आयसोलेशन वार्ड जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली ( ३७ कोरोना रुग्ण ) सात आझम कॉलनी, दोन अकोला बायपास, तीन
गवळीपुरा, दोन वंजारवाडा, एक रिसाला बाजार, एक एस.आर.पी.एफ, एक तलाबकट्टा, एक नाईकनगर, एक शिवाजीनगर, एक मंगळवारा, तीन जिल्हा परिषद हिंगोली, तीन पोस्ट ऑफिस रोड, दहा तोफखाना, एक पेन्शनपुरा येथील आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे एकूण ७०९ रुग्ण झाले 

कोरोना केअर सेंटर वसमत आणि औंढा प्रत्येकी १२ कोरोना रुग्ण एक, जवळा बाजार औंढा आणि एक स्त्री रुग्णालय क्वॉर्टर वसमत आज रोजी हिंगोली जिल्ह्यात ४७ नवीन कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत. ५६ कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण ७०९ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ५०६ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज घडीला एकूण १९५ रुग्णांवर उपचार चालु आहेत आणि ८ कोरोना रुग्णाचा मृत्यु झाला आहे. 

भरती असलेल्या रुग्णांपैकी १८ रुग्णांची प्रकृती गंभीर

हिंगोली जिल्ह्यातंर्गत आयसोलेशन वार्ड, सर्व कोरोना केअर सेंटर आणि गाव पातळीवर तयार करण्यात आलेल्या क्वॉरंनटाईन सेंटर अंतर्गत एकूण ७,६६४ व्यक्तींना भरती करण्यात आले आहे. त्यापैकी ६,७९७ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. ७,१०३ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे . सद्यस्थितीला ५३६ व्यक्ती भरती आहेत आणि आज रोजी १६० अहवाल येणे,  थ्रोट स्वब घेणे प्रलंबित आहे. आयसोलेशन वार्ड जिल्हा सामान्य रुणालय हिंगोली येथे भरती असलेल्या रुग्णांपैकी १८ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना ऑक्सीजन चालु आहे. चार कोरोना रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. 

संपादन-  प्रल्हाद कांबळे