Hingoli News : वसमतमधील टोकाई देवीच्या मंदिरात चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Hingoli News : वसमतमधील टोकाई देवीच्या मंदिरात चोरी

कुरुंदा (जि.हिंगोली) : वसमत (Vasmat) तालुक्यातील कुरुंदा येथुल टोकाईदेवी मंदिरात चोरी झाल्याची घटना मंगळवार (ता.१९) सकाळी उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी, देवीचा चांदीचा मुकुट तसेच देवीच्या गळ्यातील सोन्याचे दागिन्यांचा ऐवज चोरुन नेल्याचे समोर आले आहे. मंदिरातील अंदाजे एक लाखांच्यावर चोरी झाल्याचा अंदाज वर्तवल्या जात आहे. यामुळे गावात एकच खळबळ उडाली असुन घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. पोलीसांनी चोरांच्या शोधासाठी श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञांची टीम घटनास्थळी दाखल झाली असुन त्यांच्या साह्याने चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

हेही वाचा: Munmun Dutta : तारक मेहता फेम 'बबीता'ने सांगितला डाएट प्लॅन

पोलीस ठाण्यात या प्रकरणी सदरील घटनेची नोंद होण्याची प्रक्रिया चालु आहे. कुरुंदा येथून चार किलोमीटरच्या अंतरावर टोकाई गडावर टोकाईमातेचे मंदिर आहे. इथे भाविकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. टोकाई देवीच्या दर्शनासाठी माहाराष्ट्रासह परराज्यातून भाविक येतात. त्यामुळे हे देवस्थान सर्वदूर प्रसिद्ध आहे. मंगळवार टोकाई देवीचे पुजारी विकास इंगोले हे सकाळी देवीच्या पुजेसाठी टोकाई देवी मंदिरात आले असता मंदिराचे कुलुप तुटल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना मंदिरात चोरी झाल्याचा संशय आला. त्यांनी तात्काळ कुरुंदा पोलीस स्टेशनशी संपर्क साधुन सदरील घटनेची माहीती दिली. (Hingoli Crime)

हेही वाचा: माझ्यावर खोटा आरोप, रिक्षाचालकाने सैराट फेम अरबाज शेखला स्पष्टच सांगितले

घटनास्थळी पोलासांनी पाहणी केली असता मंदिरातील देवीचा चांदीचा मुकुट देवीचे सोन्याचे दागिने तसेच दानपेटी चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले. पोलीसांनी मंदिर परिसरात पाहणी केली. त्यानंतर श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण केले. श्वान पथकाने टोकाई गडावरुन पायथ्याशी असलेल्या महामार्गापर्यंत पाहणी केली.

Web Title: Hingoli Crime News Theft In Tokai Devi Temple Of Vasmat

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :HingoliCrime News
go to top