esakal | तरुणाचा खून, वसमतमध्ये पती-पत्नीला अटक
sakal

बोलून बातमी शोधा

मुदखेड निवघा खून प्रकरण

तरुणाचा खून, वसमतमध्ये पती-पत्नीला अटक

sakal_logo
By
पंजाब नवघरे

वसमत (जि.हिंगोली) : हिंगोली Hingoli जिल्ह्यातील वसमत Vasmat येथे कारखाना रोड भागात एका तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना रविवारी (ता.११) सकाळी घडली. या प्रकरणी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक केली आहे. वसमतमधील गणेश पेठ भागातील किशन चन्ने या तरुणास कारखाना रोड भागातील धुरपता गायकवाड या महिलेने बोलवले होते. चन्ने हे त्यांना भेटण्यासाठी गेले. त्यावेळी दोघेही घरात असताना महिलेचा पती बाबुराव गायकवाड आला. दोघेही घरात पाहून त्यांना संशय आला. त्यांनी याबाबत धुरपता यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी किशन चन्ने हा बळजबरी करत असल्याचे सांगितले.hingoli crime news youth killed in vasmat

हेही वाचा: आईसह सात वर्षांचा चिमुरडाही गेला पाण्यात वाहून, शोध कार्य सुरु

यावरून गायकवाड व चन्ने यांच्यात वाद सुरू झाला. यात बाबुराव गायकवाड याने किशन चन्नेला चाकूने भोसकले. यात त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी गुरमे, पोलिस उपनिरीक्षक खार्डे, जमादार राजू सिद्दीकी, कृष्णा चव्हाण यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या प्रकरणी दुर्गा चन्ने यांच्या तक्रारीवरून बाबुराव गायकवाड व धुरपताबाई गायकवाड यांच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक केली आहे. पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे या प्रकरणाचा तपास करित आहेत.

loading image