जुगार अड्ड्यावर छापा, एक लाखांपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त | Hingoli | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hingoli Crime
जुगार अड्ड्यावर छापा, एक लाखांपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त

जुगार अड्ड्यावर छापा, एक लाखांपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त

हिंगोली : वसमत (Vasmat) तालुक्यातील हट्टा पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या टेंभुर्णी येथे एका ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून एक लाख ६३ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल शनिवारी (ता.२०) जप्त करून सहा जणांना ताब्यात घेऊन रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टेंभुर्णी गावात येशू बाबा मंदिराच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत एका बाभळीच्या झाडाखाली शनिवारी सायंकाळी गावातील काही जण तिरट नावाच्या जुगारावर खेळुन त्यावर पैसे लावत असल्याची माहिती हट्टा पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकत सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकडून तीन हजार ८५० रुपये नगदी व जुगाराचे साहित्य, तीन मोटारसायकल (Hingoli) असा एकूण एक लाख ६३ हजार ८५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हेही वाचा: मायलेज देणारी Honda Livo खरेदी करा ९ हजारात, EMI इतका भरा

या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक गजानन मोरे यांच्या फिर्यादीवरून हट्टा पोलीस ठाण्यात सुदाम सवंडकर, हेमराज लोणकर, किशन बेगटे, गणेश सवंडकर, यशवंत इंगोले, दिलीप सवंडकर (सर्व रा. टेंभुर्णी) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई हट्टा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, सहायक उपनिरीक्षक सोनटक्के, पोलीस कर्मचारी लोखंडे, लेकुळे, सिद्दीकी यांच्या पथकाने केली आहे.

loading image
go to top