esakal | हिंगोली : कुपटी येथील सीआरपीएफ जवानाचा ह्रदयविकाराने मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

वसमत तालुक्यातील कुपटी येथील सीआरपीएफ जवान बालाजी किशनराव धुळे हे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, या पदावर १०२ बटालियन रॅपिड ऍक्शन फोर्स तनुजा नवी मुंबई येथे कार्यरत होते

हिंगोली : कुपटी येथील सीआरपीएफ जवानाचा ह्रदयविकाराने मृत्यू

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : कुपटी (ता. वसमत, जि. हिंगोली) येथील सीआरपीएफ जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने रविवारी (ता. २७) मृत्यू झाल्याची घटना घडली असुन सोमवारी (ता. २८) चार वाजता कुपटी गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

वसमत तालुक्यातील कुपटी येथील सीआरपीएफ जवान बालाजी किशनराव धुळे हे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, या पदावर १०२ बटालियन रॅपिड ऍक्शन फोर्स तनुजा नवी मुंबई येथे कार्यरत होते. राष्ट्रपतींच्या बंदोबस्तासाठी दिव दमन येथे गेले असताना रविवारी (ता. २७) डिसेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती कुरुंदा पोलिसांनी दिली आहे. 

हेही वाचानांदेड : हिंस्त्र वन्यप्राण्याच्या हल्ल्यात शेतकरी महिला गंभीर, हिमायतनगर परिसरात भितीचे वातावरण -

त्यांच्यावर सोमवारी चार वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी सीआरपीएफचे अधिकारी, संबंधित प्रशासकीय अधिकारी तथा कुरुंदा पोलिसांची उपस्थिती राहणार आहे. घटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलिस ठाण्याचे ठाणेदार सुनील गोपीनवार यांच्या पथकाने कुपटी येथील कुटुंबीयांची भेट घेतली आहे. 

दरम्यान, जवान बालाजी धुळे हे १९९२ मध्ये सीआरपीएफमध्ये दाखल झाले होते. त्यांच्या विशेष कामगिरीबद्दल त्यांचा गौरव देखील करण्यात आला होता. यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image