
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १०११७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते . त्यापैकी छाननी व माघारीनंतर ७८६१ जण रिंगणात आहेत.
हिंगोली : जिल्ह्यात ४९५ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी होत असलेल्या निवडणुकीत सोमवारी माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी १८३३ उमेदवारांनी माघार घेतल्याने जिल्ह्यात ७८६१ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. जिल्ह्यात ६२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.
मराठवाड्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
जिल्ह्यातील ४९५ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. यापैकी ६२ बिनविरोध झाल्या. यामध्ये औंढा तालुक्यात १६, सेनगाव १६, हिंगोली १७, वसमत व कळमनुरी १६ या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. उर्वरित जागांसाठी औंढा १२०९ वसमत १८७८, कळमनुरी १६२७, सेनगाव १५९९, हिंगोली १५४८ असे उमेदवार रिंगणात आहेत. हिंगोलीत ३४५, वसमतला ४७२, कळमनुरीत ४५९, सेनगाव ४२४, औंढा १३३ एकूण १८३३ उमेदवारांनी माघार घेतली आहे. माघार घेणाऱ्या उमेदवारांची संख्या आहे .
हे ही वाचा : Gram Panchayat Election : सेलू तालुक्यात 12 ग्रामपंचायती बिनविरोध ; 284 इच्छुक उमेदवांचे नामनिर्देशनपत्र माघार
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १०११७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते . त्यापैकी छाननी व माघारीनंतर ७८६१ जण रिंगणात आहेत. दरम्यान, चिन्ह वाटपात कपबशी, पतंग खटारा, गॅस आदी चिन्हांचा यात समावेश आहे. हिंगोली तालुक्यात १७ ग्रा.पं.बिनविरोध झाल्या आहेत. यात हिंगणी, खेड, लासीना, दाटेगा आमला, नांदुरा, गाडीबोरी, जांभरुण तांडा, आंबाळ खेडा, वैजापूर, बोराळा, भांडेगाव, साटबा, बोडखी, नवलगव्हाण, जामठी खुर्द समावेश आहे. वसमत तालुक्यातील माळवटा, तेलगाव, रायवाडी, माटेगाव, दगडगाव, राजापूर, बाभूळगाव, टाकळगाव या ९ ग्रा.पं.बिनविरोध झाल्या आहेत.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
सेनगाव तालुक्यात सिनगीखांबा, वेलतुरा, तांदुळवाडी, शेगाव खोडके, वरखेडा, मकोडी, लिंबाळा, कवरदडी, बोडखी (जी) सालेगाव, बरडा, वरूडकाजी, रिधोरा, सापटगाव, बटवाडी, हनकदरी या ग्रामपंचायतचा समावेश आहे.