हिंगोली : जिल्ह्यात 24 तासांत सरासरी 26.82 मिलीमीटर पाऊस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

सकाळी आठ वाजेपर्यंत मागील चोवीस तासांत एकूण 26.82 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

हिंगोली : जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. रविवारी (ता.4) सकाळी आठ वाजेपर्यंत मागील चोवीस तासांत एकूण 26.82  मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 134.10 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 352.39 मिलीमीटर पाऊस झाला आहे.  

जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर 39.47 टक्के इतकी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत मागील चोवीस  

तासात झालेला पाऊस मिली मीटरमध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे (कंसात आतापर्यंतचा एकूण पाऊस)

हिंगोली 23.71 (329.80), वसमत 15.14 (238.72), कळमनुरी 
46.00 (446.92), औंढा नागनाथ 35.25 (425.00), 
सेनगांव 14.00 (321.52) आज अखेर पावसाची सरासरी 
352.39 नोंद झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Hingoli District 26 point 82 mm rainfall in 24 hours

टॅग्स