file photo
file photo

हिंगोली : रिकाम्या हाताने परत येऊ नका, एसटी महामंडळाचा मालवाहतूक करणाऱ्या चालकांना दम 

Published on

हिंगोली : एसटी महामंडळाचे मालवाहू वाहतूक करणाऱ्या चालकांचा छळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील आठ दिवसापासून १६  मालवाहू वाहतूक करणारे चालक जिल्ह्यात अडकून पडले आहेत. माल  असेल तरच परत या अन्यथा रिकाम्या हाताने परत येऊ नका असा अजब सल्ला एस टी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाहनचालकांना दिला आहे.

त्यामुळे वाहन चालकाची परिस्थिती घर कब आओगे ट्रकच्या मागे लिहिलेल्या स्लोगन प्रमाणे झाली आहे. आठ दिवसापासून अडकलेल्या १६  चालकांना मोठा गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याचबरोबर या सर्व चालकांनी  बोलताना खंत व्यक्त केली आहे. त्याचबरोबर हिंगोली आगाराकडून कुठलीही राहण्याची व्यवस्था न केल्यामुळे संसारच एसटी बस मध्ये थाटावा लागत आहे. तर पिण्याच्या पाण्याची आणि जेवणाची देखील व्यवस्था नसल्याची कबुली  चालक बबन डहाळे,  गोपीनाथ मुरकुटे, अशोक जाधव, परळी आगार यांनी दिली आहे.

महामंडळाच्या उत्पन्नात घट झाली

दरम्यान, कोरोना संकटामुळे मागच्या काही दिवस एसटी महामंडळाच्या बसेस बंद होत्या यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात घट झाली होती. तसेच कर्मचाऱ्यांना देखील अनेक अडचणीना सामोरे जावे लागले. अनेक ठिकाणी कर्मचारी कपातीचा निर्णय देखील झाला.

शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला प्राधान्य देत ही सेवा सुरू

यात सावरत एसटी महामंडळाने लाँकडाऊन काळात मालवाहू सेवा सुरू केली. यात शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला प्राधान्य देत ही सेवा सुरू झाली. काही दिवस याला प्रतिसाद देखील मिळाला मात्र आता लाँकडाऊन संपल्याने मालवाहतूक करणार्या या गाड्यात मालवाहतूकिवर परिणाम झाला आहे.

गाडी भरण्यासाठी प्रतिक्षा करण्याची वेळ

मात्र एसटी महामंडळाने या गाड्यांच्या चालकाना रिकाम्या हाताने येऊ नका अशी तंबी दिल्याने चालक अडचणी आहेत. ज्या ठिकाणी गाड्या आहेत त्या परत येताना रिकामे येऊ नका असे सांगितले असल्याने चालकाना आहे त्याठिकाणी थांबत गाडी भरण्यासाठी प्रतिक्षा करण्याची वेळ आली आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com