हिंगोली : मामाच्या गावी  शिवार्थ दारव्हेकर यांनी बनवला पर्यावरणपूरक गड किल्ला 

file photo
file photo

औंढा नागनाथ (जिल्हा हिंगोली) : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील शिवार्थ दारव्हेकर  यांनी आपल्या मामाच्या गावी औंढा नागनाथ येथे एक आकर्षक गड किल्ला बनवला आहे.

शिवार्थ दारव्हेकर  इयत्ता पाचवी मध्ये आहे. छत्रपती शाहू प्राथमिक शाळा आखाडा बाळापूर येथे शिक्षण घेत आहे. तो एक उत्कृष्ट चित्रकार देखील आहे. त्याचे वय सध्या दहा वर्षे आहे. त्याचे आई-वडील देखील चित्रकार आहेत. त्यामुळे त्याला लहानपणापासून हे बाळकडू मिळाले आहे .किल्ला ही आपली खरी ऐतिहासिक  संस्कृती आहे. ती आपण जपली पाहिजे. स्वराज्य स्थापनेचा संकल्प महाराजांनी मावळ्यांना संघटित करून केला. या मराठी प्रदेशातील कणाकणांत महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्याचे चैतन्य निर्माण केले. त्या शिवछत्रपतींच्या पावन भूमीत आपण जन्मलो हे आपले भाग्य आहे. हा वारसा बालमनात आदर्श निर्माण करणारा आहे. शिवरायांचा प्रतापगड किल्ल्याच्या विशाल तटबंदीच्या अभेद्य बुरुजावर आजही अंगावर शहारे आणतो.रक्त सळसळतं, हा समृद्ध वारसा पुढे जाऊन मातृभूमि प्रेम , आयाबहिणीच्या संरक्षणासाठी पुढे यावा. यासाठी दिवाळीच्या आनंदात एक दिवा स्वराज्यासाठी, छत्रपतीच्या शौर्यासाठी. दिवाळी पर्यावरणपूरक साजरी व्हावी .

आपले सण- उत्सव साजरे करत असतांनाच आपले पर्यावरण अबाधित राहिले पाहिजे. यासाठी सहज उपलब्ध साहित्याचा कल्पक वापर करून किल्ला उभारणीचा आनंद साजरा केला आहे. हा किल्ला उभारणीसाठी माती कागदाचे पुष्ठे,कलर यांचा वापर केला. मामाच्या गावाला औंढानागनाथ  येथे आल्यावर आपल्यातील कलागुणांचा येथील समवयस्क मित्रांना सोबत घेऊन किल्ला उभारला आहे.हा किल्ला बनवत असतांना आखाडा बाळापूर येथील सार्थ दारव्हेकर शिवार्थ दारव्हेकर  यांच्यासह औंढा नागनाथ येथील अमृता, स्वराज बिनोरकर, आदर्श वाकडे,,  शौर्य काटकर, वरद राखे या बाल दोस्तांनी अथक प्रयत्नातुन किल्ला उभारला आहे. हा किल्ला पाहण्यासाठी  बच्चेकंपनी सोबतच मोठ्यांचाही कुतूहलाचा विषय बनला आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com