esakal | हिंगोली : ओल्या दुष्काळासाठी शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

या वर्षी सर्व शेतकऱ्यांनी खरीप हंगामात सोयाबीन पिकाची पेरणी केली होती .त्यातही दुबार ,तिबार पेरणी करावी लागली. सोयाबीन पीक काढणी दरम्यान झालेल्या परतीच्या पावसामुळे पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याने प्रति बॅग १० ते १५ किलो उतारा आलेला आहे.

हिंगोली : ओल्या दुष्काळासाठी शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

sakal_logo
By
विठ्ठल देशमुख

सेनगाव (जिल्हा हिंगोली) : कुठलेही शासकीय निकष न लावता सेनगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ शासकीय मदत जाहीर करण्याच्या प्रमुख मागणीसाठी तालुक्यातील हत्ता पाटी येथे शेतकऱ्यांच्या वतीने बुधवारी ता. २८  दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यामुळे सेनगाव-जिंतूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

या वर्षी सर्व शेतकऱ्यांनी खरीप हंगामात सोयाबीन पिकाची पेरणी केली होती .त्यातही दुबार ,तिबार पेरणी करावी लागली. सोयाबीन पीक काढणी दरम्यान झालेल्या परतीच्या पावसामुळे पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याने प्रति बॅग १० ते १५ किलो उतारा आलेला आहे. त्यामुळे पीक लागवडीचा खर्चही वसूल झाला नाही. परिणामी सर्व शेतकऱ्यांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे.

हेही वाचा -  शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी शेतकरी संघटना उतरणार रस्त्यावर -

कोणतेही निकष न लावता सेनगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा

परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. जिल्ह्याची आणेवारी ६७ टक्के  दाखविली आहे. सदर निकष लावताना कोणत्या बाबींचा आधार घेतला याचा बोध होत नाही. दरम्यान सेनगाव तालुक्यात शंभर टक्के सोयाबीन गेलेले असताना ६७ टक्के आणेवारी चुकीची दाखविली गेली आहे. कोणतेही निकष न लावता सेनगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी शेतकर्‍यांच्या वतीने  दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यामुळे जिंतुर -सेनगाव मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान महसूल विभागाचे मंडळ अधिकारी व तलाठी यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.

चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता

यावेळी काँग्रेसचे माजी जि. प. सदस्य ओमप्रकाश देशमुख, माजी सभापती नारायण बाबा राठोड, माजी संरपच हरिभाऊ गादेकर ,माजी उपसंरपच शेख हाकिम, भागोराव राठोड ,बाजीराव गडदे, मंहैन्द जैस्वाल, दत्तराव दळवी, किसन गादेकर, शेख मुश्ताक यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली .यावेळी पोलीस उपनिरीक्षक बाबुराव जाधव यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

येथे क्लिक करापरभणी : ग्रंथालय कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात

ओला दुष्काळ जाहीर न झाल्यास येत्या २६ तारखेला शेतकरी सामूहिक आत्मदहन

महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांना १०० टक्केच्या  आत आणेवारी दाखविण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर शेतकरी व लोकप्रतिनिधी यांनी  आंदोलन मागे घेतले.  दरम्यान सेनगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर न झाल्यास येत्या २६ तारखेला शेतकरी सामूहिक आत्मदहन करतील असा इशाराही यावेळी दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी दिला आहे आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image
go to top