esakal | हिंगोली : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ११४ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

जिल्ह्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानामुळे शेतकरी हतबल झाले होते ज्यामध्ये कापूस , तुर , सोयाबीन यासह इतर शेती पिकाचे मोठे नुकसान झाले होते

हिंगोली : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ११४ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये परतीच्या पावसाने घातलेल्या धुमाकुळामुळे अतिवृष्टी व पुरामुळे बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याकरीता शासनाकडून ११४ कोटीचा निधी उपलब्ध झाला असून, सदर रक्कम बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे .

जिल्ह्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानामुळे शेतकरी हतबल झाले होते ज्यामध्ये कापूस , तुर , सोयाबीन यासह इतर शेती पिकाचे मोठे नुकसान झाले होते. यामध्ये हिंगोली तालुक्यात ५५ हजार २५९ शेतकऱ्यांचे ३७ हजार ४६६ हेक्टर कळमनुरी तालुक्यातील ५९ हजार १४३ शेतकऱ्यांचे ५२०८५ हेक्टर, सेनगाव तालुक्यातील ७५ हजार २३० शेतकऱ्यांचे ४३ हजार ९४०  हेक्टर, वसमत तालुक्यात सात हजार २३१ शेतकऱ्यांचे ५० हजार ०८० हेक्टर तर औंढा नागनाथ तालुक्यातील ४६ हजार ८०३ शेतकऱ्यांचे ४६१० हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाले होते.

हेही वाचा - मालकीच्या जागांसाठी परभणी महापालिकेला आली ‘जाग’

त्यात विशेष म्हणजे जिल्ह्यात सोयाबीनचे पीक ह प्रमुख समजले जाते . त्यातही सोयाबीनचा  उतारा घटल्याने लागवडीचा खर्चही निघाला  नाही . यातच शेतीच्या वादातून काही ठिकाणी  शेतकऱ्यांनी केलेल्या काढणीचे ढिगही जाळण्याच्या घटना घडल्या होत्या . 

हिंगोली जिल्ह्यातील ३.०८ लाख शेतकऱ्यांचे २.२९ लाख हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी शासनाकडे सादर केला होता . त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीची घोषणा केली . मदतीकरीता शासनाने ११४ कोटी रूपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे . सदरील रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरीता जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी , निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी हालचाली सुरू केल्या आहेत.

संपादन - प्रल्हाद कांबळे