हिंगोली : जिल्ह्यातील अंगणवाड्यात हात धुवा उपक्रम

राजेश दारव्हेकर
Friday, 16 October 2020

जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात मिळून एकूण एक हजार ८९ अंगणवाड्या आहेत.या सर्व अंगणवाड्यात मागील महिन्यात जिल्हा परिषदेचे सीईओ राधाबीनोद शर्मा, महिला बालकल्याण सभापती रूपालीताई पाटील गोरेगावकर , उपमुख्य कार्यकारी अधिकारी  गणेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सिडीपीओ राजकुमार धापसे, नैना पाटील यांनी जिल्ह्यातील अंगणवाड्यात पोषण अभियान हा उपक्रम राबविण्यात आला 

हिंगोली :  जिल्ह्यातील अंगणवाड्यात मागील जागतिक हात धुवा दिनाच्या निमित्ताने गुरुवारी (ता. १५) हात धुणे उपक्रम राबविण्यात आला असून पाल्याना मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी दिली.

जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात मिळून एकूण एक हजार ८९ अंगणवाड्या आहेत.या सर्व अंगणवाड्यात मागील महिन्यात जिल्हा परिषदेचे सीईओ राधाबीनोद शर्मा, महिला बालकल्याण सभापती रूपालीताई पाटील गोरेगावकर , उपमुख्य कार्यकारी अधिकारी  गणेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सिडीपीओ राजकुमार धापसे, नैना पाटील यांनी जिल्ह्यातील अंगणवाड्यात पोषण अभियान हा उपक्रम राबविण्यात आला.  यामध्ये  गरोदर माता ,स्तनदा माता, किशोर वयीन मुली यांना मार्गदर्शन करण्यात आले, आहार कसा घ्यावा, योग्य वेळी काळजी, बाळाची काळजी आदी बाबत पोषण अभियानात माहिती देण्यात आली. याशिवाय झिरो ते सहा वर्षातील बालकांची वजन, उंची ,आरोग्य तपासणी, दंड घेर आदी उपक्रम राबविण्यात आले. त्यामुळे आजघडीला कुपोषित बालकांची संख्या घटली असून नगण्य प्रमाण आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या प्रयत्नाला यश आले आहे. 

राज्यात हिंगोली जिल्हा परिषदेने आघाडी

महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने कुपोषित बालकांचे प्रमाण कमी करण्यात राज्यात हिंगोली जिल्हा परिषदेने आघाडी घेतली आहे. तसेच यापूर्वी तत्कालीन महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंढे यांच्या हस्ते दोन वेळेस अंगणवाडी सेविकांना उत्कृष्ट सेवेची पावती म्हणून मुंबई येथे गौरव करण्यात आला. 

जिल्हयाने विविध उपक्रम संख्या राबविण्यात

डेप्युटी सीईओ गणेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला बालकल्याण विभागाची घोडदौड सुरु आहे. गुरुवारी जागतिक हात दुवा दिनानिमित्याने जिल्ह्यातील अंगणवाड्यात बालकांचे हात स्वछ धुण्यात आले. अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस प्रामाणिक पणे कोरोना काळात काम करीत असून घरोघरी जाऊन कोरोना विषाणूची जनजागृती करीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाड्या बंद असल्या तरीही डोअर टू डोअर जाऊन बालकांचे लसीकरण ,आदी उपक्रम सुरू आहेत. आहार वाटप केला जात आहे. गरोदर माता, स्तनदा माता, किशोर वयीन मुलींना मार्गदर्शन केले जात आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यात पोषण अभियान राबविण्यात आले. यावेळी जिल्हयाने विविध उपक्रम संख्या राबविण्यात अकराव्या क्रमांकावर स्थान मिळविले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Hand washing activities in Anganwada in the district nanded news