

Hingoli Weather Update Heavy Rain Forecast MLA Raju Navghare Urges Public to Follow Administration Safety Instructions
esakal
-पंजाब नवघरे
वसमत : हवामान विभागाने हिंगोली जिल्ह्यासह परिसरात अति मुसळधार पावसाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू नवघरे यांनी नागरिक व शेतकरी बांधवांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. संभाव्य पूरस्थिती, नदी-नाल्यांना येणारे पाणी आणि अतिवृष्टीमुळे उद्भवू शकणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून प्रत्येकाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.